Sachin Tendulkar याची मुलगी Sara Tendulkar बॉलीवूड नायिकेला लाजवेल इतकी आहे ग्लॅमरस, पाहा तिचे सुंदर Photos
सारा तेंडुलकर (Photo Credit: Instagram)

‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) नेहमीच चर्चेत राहणार विषय आहे. त्यामुळे त्याचे कुटुंबीय देखील माध्यमांच्या नजरेत येतात. मास्टर-ब्लास्टर सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर देखील आपल्या खेळामुळे चर्चेत असतो. पण या दोघांमध्ये सचिनची लाडकी मुलगी साराने (Sara Tendulkar) मात्र अनेकदा आपले लुक्स आणि ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडिया यूजर्सचे लक्ष वेधले आहे. साराच्या इन्स्टाग्राम अकाउंटबद्दल बोलायचे तर मास्टर-ब्लास्टरची सोनपरी सोशल मीडियावर इतकी सक्रिय नसली तरी तिचे सुमारे 1.2 लाख फॉलोअर्स आहेत. साराच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे बरेच फोटोज आहेत ज्यात ती एकाद्या बॉलीवूड  (Bollywood) नायिकेलाही लाजवेल इतकी स्टायलिश आणि सुंदर दिसत आहे.

साराबद्दल फार कमी जणांना माहित असेल की ती जितकी ग्लॅमरस आहे तितकीच तिला शिक्षणाचीही आवड आहे. साराने लंडनमधून वैद्यकीय पदवी मिळाली आहे. 23 वर्षीय सारा तिच्या लुक्सबाबतीत आई अंजली तेंडुलकरकडे मोठ्या प्रमाणात दिसते आणि हे तिच्या फोटोंमधून स्पष्टपणे दिसून येते. सारा तिच्या आई-वडिलांसोबत क्रिकेटसह इतर कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना देखील दिसते. सौंदर्य आणि तिच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे सारा सोशल मीडियावर यूजर्सचे चांगले लक्ष वेधून घेते. पहा साराचे सुंदर व ग्लॅमरस फोटोज:

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar)

माय-लेकीची जोडी

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar)

सारा पदवी समारंभात

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar)

स्टायलिश सारा

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar)

साराला फिरण्याची देखील आवड आहे... 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar)

आकर्षक ड्रेसमध्ये सारा

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar)

साराचे शालेय शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून झाले असून तिने युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून पदवी पूर्ण केली आहे. साराच्या बॉलिवूड डेब्यूबद्दलच्या बर्‍याचदा अफवा माध्यमांमध्ये पेरल्या होत्या. काही वेळेपूर्वी ती शाहिद कपूरसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचाही असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र स्वत: सचिन तेंडुलकरने हे अहवाल सरसकट फेटाळून लावले.