भारताने या वेळी 71 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे (71st Miss World Pageant) म्हणजेच विश्वसुंदरी (Miss World) स्पर्धा 2024 चे आयोजन स्वीकारले आहे. तब्बल 28 वर्षांनी भारताला हा बहुमान मिळाला आहे. जगभरातील सौंदर्य, वैविध्य आणि सक्षमीकरणाचा उत्सव साजरा करण्याचे आश्वासन देणारी अशी ही भव्य स्पर्धा जगभरात प्रसारित केली जाईल. येत्या 18 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान ही स्पर्धा भारतात दिल्ली येथील सभा मंडपम आणि मुंबई या दोन प्रमुख शहरांमध्ये पार पडेल. प्राप्त माहितीनुसार, 20 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतील हॉटेल अशोक येथे इंडिया टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (ITDC) द्वारे आयोजित 'उद्घाटन समारंभ' आणि 'इंडिया वेलकम द वर्ल्ड गाला' या कार्यक्रमांनी उत्सवाची सुरुवात होईल. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये (Jio World Convention Centre) 9 मार्च रोजी स्पर्धेचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे.
ऐतिहासिक संदर्भ:
भारताने या पूर्वी सन 1996 मध्ये बेंगळुरू येथे मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन केले होते. रीता फारिया पॉवेल ही भारताची पहिली विश्वसुंदरी आहे. जीने 1966 मध्ये मिस वर्ल्डचा मुकुट मिळवत इतिहास रचला. सन 1994 मध्ये ऐश्वर्या राय बच्चन, 1997 मध्ये डायना हेडन, 1999 मध्ये युक्ता मुखी आणि 2000 मध्ये प्रियांका चोप्रा जोनास यांनीही मिस वर्ल्डचा किताब पटकवला आहे. अगदी अलिकडील काळात मानुषी छिल्लरने हिने 2017 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकून हा वारसा पुढे सुरुठेवला. (हेही वाचा, India Host Set to Miss World 2023: तब्बल 27 वर्षांनी भारत करणार मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन, Sini Shetty करणार देशाचे प्रतिनिधित्व)
टेलिकास्ट तपशील:
71व्या मिस वर्ल्ड फायनलचे 9 मार्च रोजी संध्याकाळी 7:30 ते 10:30 या वेळेत थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, जे दर्शकांना सौंदर्य आणि यशाच्या या जागतिक उत्सवाची आकर्षक झलक देतात.
जागतिक उत्सव:
मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा आणि सीईओ, ज्युलिया एव्हलिन मॉर्ले सीबीई यांनी या स्पर्धेचे यजमानपद भारताने गेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, मिस वर्ल्ड हा केवळ एक कार्यक्रम नसून महिलांच्या यशाचा उत्सव साजरा करणारा आणि महिनाभर चालणारा उत्सव आहे. जगाला भारतात आणणे आणि जगासमोर भारताचे प्रदर्शन करणे हे या व्यासपीठाचे उद्दिष्ट आहे. (हेही वाचा, Miss World 2023: यंदा भारतामध्ये होणार मिस वर्ल्ड 2023 स्पर्धेचे आयोजन; तब्बल 27 वर्षानंतर देशाला मिळाले विश्वसुंदरी स्पर्धेचे यजमानपद)
सांस्कृतिक प्रदर्शन:
भारतातील मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनचे सल्लागार मुनीश गुप्ता यांनी ठळकपणे सांगितले की, हा कार्यक्रम जागतिक प्रेक्षकांना भारताची संस्कृती, परंपरा, वारसा, कला, हस्तकला, वस्त्र, पाककृती आणि पर्यटन यांची समृद्ध टेपेस्ट्री प्रदान करेल. प्रत्येक स्पर्धकाकडे MissWorld.com वर एक समर्पित मीडिया चॅनेल असेल. जे ते टॉप 20 फायनलमध्ये स्थान देण्यास पात्र का आहेत हे दाखवण्यासाठी मदत करेल.
एक्स पोस्ट
Chairman of Miss World, Julia Morley CBE stated "Excitement fills the air as we proudly announce India as the host country for Miss World. A celebration of beauty, diversity, and empowerment awaits. Get ready for a spectacular journey! 🇮🇳 #MissWorldIndia #BeautyWithAPurpose
— Miss World (@MissWorldLtd) January 19, 2024
इव्हेंट हायलाइट्स आणि स्पर्धा:
वर्ल्ड टॉप डिझायनर अवॉर्ड, मिस वर्ल्ड टॉप मॉडेल, मिस वर्ल्ड स्पोर्ट्स चॅलेंज, टॅलेंट फायनल, मल्टी-मीडिया चॅलेंज आणि बरेच काही या स्पर्धेत असेल. ही स्पर्धा मुंबई आणि नवी दिल्लीमध्ये रंगणार आहेत. मिस वर्ल्ड फायनलची निर्मिती एन्डेमोल शाइन इंडियाद्वारे केली जाईल. इव्हेंट निर्मितीमध्ये देशाच्या उत्कृष्टतेवर अधिक भर दिला जाईल.