Sini Shetty | (Photo Credit - instagram)

Miss World 2023 Hosted by India: मिस वर्ल्ड 2023 स्पर्धा यंदा भारतात आयोजित केली जाणार आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल 27 वर्षांनी विश्वसुंदरी स्पर्धा आयोजित करण्याची संधी भालताला मिळत आहे. विश्वसुंदरी स्पर्धेचे यंदाचे 71 वे वर्ष (71st Miss World 2023) आहे. उल्लेखनीय असे की, सनी शेट्टी ही तरुणी यंदाच्या मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करत आहे. विश्वसुंदरी स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान भारताला मिळत असल्याची घोषणा मिस वर्ल्ड संस्थेच्या अध्यक्षा आणि सीईओ (CEO of Miss World organization) ज्युलिया मोर्ले (Julia Morley) यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

71व्या मिस वर्ल्ड फायनलचे नवे ठिकाण म्हणून भारताची निवड झाल्याची घोषणा करताना आपणास प्रचंड आनंद होत असल्याचे ज्युलिया मोर्ले यांनी म्हटले. जगभरातील विविध देशांची संस्कृती आणकर्षण आणि चित्तथरारक अनुभव जगासोबत सामायिक करण्यासाठी आता आम्ही विलंब करु शकत नाही. त्यामुळे विश्वसुंदरी स्पर्धेच्या 'इनक्रेडिबल इंडिया'च्या प्रवासात आम्ही 71वी आणि सर्वात नेत्रदीपक मिस वर्ल्ड फायनल सादर करत आहोत, असे मोर्ले म्हणाल्या. (हेही वाचा, Miss World 2023: यंदा भारतामध्ये होणार मिस वर्ल्ड 2023 स्पर्धेचे आयोजन; तब्बल 27 वर्षानंतर देशाला मिळाले विश्वसुंदरी स्पर्धेचे यजमानपद)

सिनी शेट्टी करणार भारताचे प्रतिनिधित्व

दरम्यान, फेमिना मिस इंडिया 2022 चे विजेते म्हणून घोषित झालेली सिनी शेट्टी मिस वर्ल्ड 2023 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. भारत खर्‍या अर्थाने काय आहे हे जगभरातून तिच्या बहिणींना दाखवण्यासाठी आपण उत्साही असल्याची भावना तिने व्यक्त केली आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना शेट्टी म्हणाली, भारताचा खरा अर्थ काय आहे, भारत काय आहे, भारतातील विविधता काय आहे हे दाखवण्यासाठी आणि जगभरातील माझ्या सर्व बहिणीचे भारतात त्यांचे स्वागत करण्यासाठी खूप उत्सुक आहे.

सिनी शेट्टी हिचा जन्म मुंबईत झाला आहे. पण तिचे कुटुंबीय कर्नाटकचे आहे. त्यामुळे मिस इंडिया 2022 स्पर्धेत तिने कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व केले. सिनी शेट्टी हिने अकाऊंटिंग आणि फायनान्समध्ये पदवी प्राप्त केली आहे. मिस इंडिया 2022 ची विजेती CFA (चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट) साठी तयारी करत असल्याचे समजते. सिनी शेट्टी हिने एका मार्केटिंग फर्ममध्येही काम केले आहे. शालेय शिक्षणासोबत तिने भरतनाट्यमचे शिक्षणही घेतले आहे.