Ganeshotsav 2019: गणेशोत्सवाच्या सोहळ्यात बाप्पाच्या डिझाईनची मेहेंदी वाढवेल तुमच्या हाताचे सौंदर्य, नक्की ट्राय करा (Watch Video)
Easy Ganesh Mehndi Designs For Ganesh Chaturthi (Photo Credits: Instagram and Pixabay)

श्रावण  संपताच गणेश भक्तांना बाप्पाच्या आगमनाचे वेध लागतात. यंदा भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला म्हणजेच 2 सप्टेंबर पासून देशभरात गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2019) सोहळा साजरा होणार आहे. कोणताही सण समारंभ म्हणताच स्त्रियांचा उत्साह हा मोजमापाच्या पल्याड पोहचलेला असतो. त्यातही गणपती म्हणजे नटून थटून मिरवण्याची नामी संधी असते. तुम्ही देखील आतापर्यंत कोणत्या दिवशी काय कपडे घालायचे इथपासून ते कोणत्या कपड्यांवर काय ज्वेलरी सूट होईल इथपर्यंत सर्व बेत आखून ठेवला असेल. ठेवणीतले खास कपडे घालून , शृंगार करून तयार होताना तुमच्या हाताचे सौंदर्य खुलवून देणारी मेहेंदी (Mehendi Designs) असले तर काही औरच बात होऊन जाते. पूर्वीच्या काळी हातावर शुभ शकुन म्ह्णून मेहेंदीचे ठिपके काढण्याची पद्धत होती कालांतराने अनेक महिला हातभर मेहेंदी काढू लागल्या. यंदा यामध्ये पुढे आणखीन कल्पकता आणून काहींनी चेहरे, मुखवटे असलेली मेहेंदी काढायला सुरुवात केली.

यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने आम्ही आपल्यासाठी अशाच काही हटके मेहंदीचे नमुने एकत्र केले आहेत. यानुसार काही छोट्या ट्रीक्सने आपण चक्क हातावरच बाप्पाचा चेहरा काढून तुम्ही काहीतरी भन्नाट करू शकाल .. मग वाट कसली पाहताय.. मेहेंदीचा कोन हातात घ्या आणि या बाप्पा विशेष डिझाइन्स नक्की ट्राय करा.. (Ganeshotsav 2019: यंदा बाप्पासाठी बनवा खास इको फ्रेंडली मखर; थर्माकॉल, प्लॅस्टिकला रामराम करून निवडा 'हे' पर्याय)

 

View this post on Instagram

 

#Mehndi #MehndiInToronto #Toronto #Henna #MehndiArtist #HennaArtist #Ganesh #GaneshMehndi #OmGanesh #Om

A post shared by Risha Khatri (@thepursuitsofadesigirl) on

(Ganeshotsav 2019: आपल्या राशीनुसार निवडा गणपतीच्या मूर्तीचे रंग; घरात नांदेल सुख समाधान व राहील बाप्पाचा आशीर्वाद)

 

View this post on Instagram

 

#Mehndi #MehndiInToronto #Toronto #Henna #MehndiArtist #HennaArtist #Ganesh #GaneshMehndi #OmGanesh #Om

A post shared by Risha Khatri (@thepursuitsofadesigirl) on

गणेशोत्सवाचा सोहळा हा देशविदेशात साजरा होत असला तरी महाराष्ट्रात या सणाचा खास उत्साह असतो. त्यामुळे या लेखात तुम्हाला महाराष्ट्रीयन शैलीच्या मेहेंदीची झलक पाहायला मिळेल. जाळी, बिंदू, रेषा यांची हातभार डिझाईन ही खासियत असलेल्या मेहेंदीने तुम्ही आपला लूक पूर्ण करू शकाल.