Eco friendly Ganpati decoration ideas (Photo Credits: Instagram/ganpati_decoration_ and YouTube grab)

Eco- Friendly Makhar Ideas: सर्वांचा लाडका सण गणेशोत्सव आता अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपला आहे. महाराष्ट्रात या सणाचं एवढे क्रेझ आहे की दहा पंधरा दिवस आधीपासूनच गणेशभक्त बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरु करतात. पण या सगळ्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यंदा बाप्पांना बसण्यासाठी लागणारी आरास कशी करायची याचा विचार केलायत का? खरंतर अलीकडे  प्रत्येक गोष्ट बाजारात सहज उपलब्ध होत असली तरी त्यात थर्मोकोल, किंवा प्लॅस्टिकचा वापरच अधिक आढळतो. मागील वर्षी मुंबई उच्च न्यायालयाने थर्मोकोल व प्लॅस्टिकच्या मखराच्या विक्रीवर बंदी घातली होती. थर्माकोल (Theromocol) किंवा पॉलीस्ट्रीन फोम (Polystyrene Foam) ने पर्यावरणाची बरीच हानी होते. ,म्ह्णून मग हे टाळून यंदा आपल्या हातून बाप्पांची सेवा करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी इको फ्रेंडली(Eco- Friendly Makhar) मखर बनवण्याचा पर्याय नक्कीच निवडू शकता.

घरातील जागेनुसार, रंगसंगतीनुसार आणि अर्थात तुमच्या कल्पक बुद्धीच्या कल्पनांशी सांगड घालून तुम्हाला यंदा बाप्पांसाठी खास मखर अगदी झटपट बनवता येईल. तुमच्या या टास्क मध्ये आम्ही आपल्यासाठी खास तयार केलेली ही इको- फ्रेंडली मखर आयडियाजची यादी नक्की मदत करेल, चला तर मग पाहुयात काही हटके पर्यावरण स्नेही कल्पना...

    • फुलापानांचा देखावा

  • टोपलीचे झुंबर

  • पडदे आणि रोषणाई

      • मोराची आरास

  • कागदाचे मखर

यंदा 2  सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या या सोहळ्यात दहा दिवस धम्माल, मजा मस्ती करत गणरायाची मनोभावे सेवा केली जाणार आहे. खरतर सण म्हणताच पर्यावरणाचे भान आपल्याला उरात नाही पण यंदा इको फ्रेंडली मखरामुळे तुम्ही नक्कीच निसर्गाची रक्षण करण्यात योगदान देऊ शकाल.