Extra Marital Affairs: 'मी अनेक पुरुषांशी Sex करून वाचवली आहेत त्यांची लग्ने', महिलेचा धक्कादायक खुलासा, जाणून घ्या सविस्तर
Gweneth Lee (संग्रहित संपादित प्रतिमा)

या जगात प्रत्येकाचे स्वतःचे छंद असतात. काहींना प्रवासाचा शौक असतो, तर काहींना खाण्याची आवड असते. काहींना भरपूर पैसा कमवायचा असतो असतो तर काहींना नाव. परंतु जगात असेही काही लोक आहेत ज्यांच्या छंदांबद्दल जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटते. ब्रिटनमध्ये (United Kingdom) राहणाऱ्या एका महिलेला फक्त विवाहित पुरुषांसोबतच अफेअर ठेवण्याचा छंद आहे. ग्वेनेथ ली (Gweneth Lee) असे या महिलेचे नाव असून ती 49 वर्षांची आहे. ग्वेनेथला फक्त विवाहित पुरुषांशी प्रेमसंबंध ठेवायला आवडते. एवढेच नाही तर तिला कोणाची बायकोही व्हायचे नाही. तिने स्वतः एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे.

घरी एकटे राहण्यापेक्षा विवाहित पुरुषांसोबत वेळ घालवणे मला आवडते, असे ती म्हणते. लीने सांगितले की, 2017 मध्ये तिचे एका पुरुषाशी ब्रेकअप झाले होते. त्यांचे नाते चार वर्षे जुने होते मात्र त्यानंतर तिचे एकही सिरीयस रिलेशन झाले नाही. तिने पुढे सांगितले की, तिचे लग्न झाले होते मात्र वयाच्या 31 व्या वर्षी तिच्या पतीचे कर्करोगाने निधन झाले. त्यानंतर ती एकदम एकटी पडली होती.

या एकटेपणामधून स्वतःला बाहेर काढण्यासाठी तिने आपले जीवन बदलण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून ती लग्न झालेल्या पुरुषांशी प्रेमसंबंध ठेवत आहे. ती म्हणते की, ‘लोक माझ्याबद्दल काय विचार करतात याची मला पर्वा नाही. हे माझे जीवन आहे आणि मी ते मला हवे तसे जगते.’ लीच्या अशा वागण्यामुळे अनेक लग्ने तुटली आहेत, मात्र तिच्यामते तिने अनेक लग्ने वाचवली आहेत.

ती म्हणते, ‘मला कधीही कोणाचे लग्न मोडावे असे वाटत नाही किंवा ते लग्न  मोडून मला नवीन नातेसंबंध ठेवायचे नाहीत. त्याऐवजी मी पुरुषांना त्यांच्या लैंगिक गरजा भागवण्यास मदत करते. जेणेकरून त्यांना बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. जर माझ्या सर्व प्रियकरांना त्यांच्या पत्नींशी आयुष्यभर विश्वासू राहावे लागले असते तर काही वर्षांमध्येच ते सर्व घटस्फोटित झाले असते.’ (हेही वाचा: Sex Doll: पतीच्या उच्च कामवासनेने त्रस्त होती महिला; नवऱ्याला भेट म्हणून दिली स्वतःसारखी दिसणारी 'सेक्स डॉल')

ती पुढे म्हणते. ‘माझ्या प्रियकरांना माहित आहे की, माझ्याशी डेटिंग केल्याने कोणताही त्रास होणार नाही. मी त्यांच्या बायकांना फोन करणार नाही आणि कोणतीही समस्या निर्माण करणार नाही. त्यांची लग्ने अजूनही टिकली आहेत कारण मी त्यांच्या इतर अनेक गरजा भागवल्या आहेत. अनेक पुरुषांना सेक्समध्ये विविध गोष्टी ट्राय करायच्या असतात मात्र त्यांच्या बायकांसोबत ते शक्य नसते. अशावेळी मी त्यांना मदत करते. जगभरात अनेक ठिकाणी माझे असे प्रियकर आहेत. या प्रियकरांना भेटण्यासाठी मी अनेक देशात फिरले आहे व लोकांची लग्ने वाचवली आहेत.’