Dinner: रात्रीच्या जेवणात Starch Containing Foods ते Chocolates हे  ५ पदार्थ कधीही खाऊ नये, होऊ शकतो गंभीर आजार, जाणून घ्या संपूर्ण माहिती
pizza

5 Things to Never Eat in Dinner: सकाळच्या नाश्ता खूप महत्वाचा मानला जातो आणि म्हणूनच ते अत्यंत पौष्टिक असावे असे अनेक ठिकाणी सांगितले जाते. मात्र, रात्रीच्या जेवणाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. परंतु, रात्री तुम्ही काय खातात याकडेही लक्ष देणे अधिक गरजेचे आहे आणि रात्रीच्या जेवणाकडे दुर्लक्ष करू नये कारण रात्री काही पदार्थ खाल्ल्याने छातीत जळजळ, गॅस समस्या, झोप न लागणे, वजन वाढणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी तुम्ही जास्त कार्ब, फॅटीयुक्त पदार्थ खाणे टाळावे. असा सल्ला तज्ञांकडून दिला जातो. ऍसिडयुक्त पदार्थ, स्निग्ध आणि मसालेदार पदार्थ रात्रीच्या वेळी खाणे टाळावे, दरम्यान अनेकांना रात्रीच्या जेवणात कोणत्या पदार्थांचा समावेश करावे याबद्दल संपूर्ण माहिती नसते, तर आम्ही रात्रीच्या जेवणात कोणते पदार्थ खाऊ नये, याची यादी घेऊन आलो आहोत, चला तर मग जाणून घेऊया [ हे देखील वाचा: Whats App Update: आता 48 तासात केव्हाही, कुठलाही व्हॉट्सअॅप मेसेज डिलीट करण्याची मुभा; व्हॉट्सअॅपचा नवा अपडेट]

पाहा यादी:

स्टार्चयुक्त पदार्थ

पास्ता, तांदूळ आणि बटाटे यासारखे पदार्थ रात्रीच्या जेवणासाठी योग्य नाही. रात्रीच्या वेळी हे अन्नपदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची आणि इन्सुलिनची पातळी वाढू शकते. हे पदार्थ रात्रीच्या वेळी पचायला जड असल्यामुळे शरीरात चरबी वाढते. स्टार्चयुक्त पदार्थ खाल्यास वजन वाढणार हे नक्की. तुम्ही रात्री प्रथिनेयुक्त पदार्थ किंवा/आणि हिरव्या भाज्या खाऊ शकता.

स्निग्ध आणि चरबीयुक्त पदार्थ

स्निग्ध पदार्थ रात्री खाऊ नयेत कारण ते पचायला जड असतात. तसेच, ते तुमच्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टच्या कार्यात व्यत्यय आणू शकतात.

मसालेदार पदार्थ

रात्री मसालेदार पदार्थ खाल्ल्याने छातीत जळजळ होऊ शकते, मसालेदार खाल्यास छातीच्या खालच्या भागात जळजळ होणे, तोंडात आम्लाची चव, अपचन सारखी वेदना इ. होऊ शकतात. 

कर्बोदके

कार्बोहायड्रेट्स उर्जेसाठी आवश्यक असले तरी, तुम्हाला रात्रीच्या वेळी कर्बोदकयुक्त पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्या पदार्थामध्ये उच्च ग्लायसेमिक  असते आणि त्यामुळे ते रक्तात जलद गतीने शोषले जाऊ शकते. याचा अर्थ, जर तुम्ही व्यायाम किंवा कोणताही शारीरिक व्यायाम केला नाही तर ते शरीरात चरबीच्या रूपात साठवले जातील, ज्यामुळे तुमचे वजन वाढेल. म्हणून, आपण रात्रीच्या वेळी साखर, पिझ्झा, सोडा, पास्ता आणि बटाटे यासारखे पदार्थ खाऊ नये अशा सल्ला दिला जातो.

चॉकलेट्स

चॉकलेटमध्ये कॅफिन असते ज्यामुळे झोप लागत नाही. रात्रीच्या वेळी चॉकलेट्स खाल्यास अस्वस्थता, मळमळ, पोटात जळजळ, हृदय गती वाढणे इत्यादी समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

रात्रीच्या जेवणात पचनास हलके असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. त्यामुळे या समस्या होणार नाही. बाहेरच्या अन्नमुळे आणि मसालेदार पदार्थांमुळे अनेक गंभीर आजार होत आहेत, निरोगी राहण्यासाठी पौष्टिक अन्न खा, भरपूर पाणी प्या, व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या, तुम्ही नेहमीच निरोगी राहाल. कोरोनामुळे रोगप्रतिकार शक्ती किती महत्वाची आहे हे कळले आहे. आणि पुढे अशा अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो याचे भान ठेऊन निरोगी राहण्याचे प्रयत्न करा.