व्हॉट्सअॅप (Whats App) कायमच आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन अपडेट (Update) घेवून येताना दिसतो. जगभरात (World Wide) व्हॉट्स अॅप वापरणाऱ्यांची (Users) संख्या मोठी आहे. पण यावेळी व्हॉट्स अॅप तुमच्या मेसेजेस बाबत एक भन्नाट अपडेट घेवून आलं आहे. या अपडेट नुसार आता व्हॉट्स अॅपवरील तुम्ही पाठवलेला कुठलाही मेसेज तुम्हाला 48 तासात केव्हाही डिलीट करता येणार आहे.तसेच पाठवलेला तो मेसेज (Message) फक्त संपूर्ण चॅटमधून (Chat) डिलीट (Delete) करता येणार आहे. म्हणजेच तुम्हाला कुठलाही मेसेज डिलीट करायचा असल्यास तुम्ही त्यावर लॉन्ग प्रेस (Long Press) केलं की वरच्या बाजूला डिलीट असं ऑप्शन (Option) येतं. त्यावर क्लीक केलं की डिलीट फॉर मी (Delete For Me), डिलीट फॉर एव्हरीवन (Delete For Everyone) आणि कॅन्सल (Cancel) अशी तीन ऑप्शन येतात यासाठीच हा नवा अपडेट वापरता येणार आहे.
पूर्वी तुम्ही कुणाला कुठला मेसेज पाठवला आणि तो डिलीट करायचा असल्यास फक्त 24 तास म्हणजे एक दिवसाचा कालावधी (Duration) देण्यात आला होता. पण आता तो कालवधी वाढवण्यात आला असुन 48 तास करण्यात आला आहे. म्हणजे तुम्ही कुणालाही पाठवलेला कुठलाही मेसेज दोन दिवसात (2 Days) कधीही डिलीट करता येणार आहे. तसेच हा मेसेज डिलीट फॉर मी म्हणजे स्वतच्या चॅट मधूनचं नाही तर डिलीट फॉर एव्हरीवन म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीला तो मेसेज पाठवाला आहे त्याच्या चाट मधून पण तो डिलीट करणं सहज शक्य होणार आहे. गोपनियतेची (Privacy) बाब लक्षात घेता व्हॉट्सअपने ही नवी अपडेट घेवून आल्याची चर्चा आहे. (हे ही वाचा:-Har Ghar Tiranga: Social Media च्या Profile Picture वर तिरंगा ठेवण्याचं पंतप्रधान मोदींच आवाहन, Whats App, Facebook, Instagram सह Twitter चा 'असा' बदला प्रोफाईल पिक्चर)
तसेच पूर्वी तुम्ही पाठवलेला मेसेज जर कुणी वाचला असेल त्यानंतर तो तुम्हाला डिलीट करणं अशक्य असायचं पण आता या नव्या अपडेटनुसार तुम्हाला पुठच्याने वाचलेला मेसेज सहज डिलीट करता येणार आहे. पण ४८ तासांच्या म्हणजे दोन दिवसांच्या आता. व्हॉट्सअपच्या या नव्या अपडेटला व्हॉट्सअप युजर मोठी पसंती दर्शवत आहेत. तरी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही हा नवा अपडेट वापरला आहात का? नसेल वापरल्यास लगेच वापरुन बघा.