Maharashtra Shocker: नागपूरात चॉकलेट खाल्ल्याने 17 विद्यार्थ्यांना विषबाधा, चॉकलेट देणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु
Chocolate. (Photo Credits: Pixabay)

Nagpur: नागपूर जिल्ह्यातील सतरा विद्यार्थ्यांना (Scholl Student) शनिवारी एका अज्ञात व्यक्तीने दिलेल्या चाॅकलेटमधुन (Chocolates) विषबाधा (Food Poisoning) झाली, एका अधिकाऱ्याने सांगितले की, सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते धोक्याबाहेर आहेत. उत्तर अंबाझरी रोडवरील मदन गोपाल हायस्कूलमधील (Madan Gopal High School) इयत्ता तिसरी, चौथी आणि पाचवीचे विद्यार्थी जेवणाच्या मधल्या सुट्टीत शाळेच्या बाहेर खेळत होते आणि एका व्यक्तीने वाटलेली चॉकलेट खाल्ली, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

"त्या व्यक्तीने मुलांना सांगितले की आज त्याचा वाढदिवस आहे. चॉकलेट खाल्ल्यानंतर एका तासाच्या आत, 17 विद्यार्थ्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली आणि त्यांना उलट्या होऊ लागल्या. त्यांना सीताबल्डी येथील लता मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले," असे ते म्हणाले. रुग्णालयातील एका डॉक्टरांनी सांगितले की, "ते सर्व धोक्याबाहेर आहेत. तीन विद्यार्थी अतिदक्षता विभागात आहेत. बाकीचे निरीक्षणाखाली आहेत." (हे देखील वाचा: RPF Mock Drill Dombivli: मॉक ड्रिल दरम्यान आरपीएफकडून अश्रुधुराचा वापर, नागरिकांचा श्वास कोंडला, डोळ्यांतही जळजळ; डोंबिवली येथील घटना)

सीताबल्डी पोलिस स्टेशनच्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की त्या माणसाचा शोध सुरू आहे, ज्याचा काही विद्यार्थ्यांनी दावा केला की तो काळ्या कारमध्ये आला होता, तर काहींनी सांगितले की त्याने मुखवटा घातलेला होता. आरोपीला पकडण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार असल्याचे वरिष्ठ निरीक्षक अतुल सबनीस यांनी सांगितले.