Yes Bank बंद करणार 50 शाखा; ATM ची संख्याही होऊ शकते कमी; जाणून घ्या काय आहे यामागचं कारण
Yes Bank (Photo Credits: PTI)

येस बँक (Yes Bank) आपल्या 50 शाखा (Branches) बंद करणार आहे. या व्यतिरिक्त बँक आपल्या एटीएमची संख्यादेखील कमी करण्याच्या विचारात आहे. कारण, नवीन व्यवस्थापनाच्या अंतर्गत बँकने चालू आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये चालू खर्चात 20 टक्के कपात करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. येस बँकेचे नवे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक प्रशांत कुमार यांनी सांगितलं की, बँक लीजवर न दिलेल्या जागा परत करत आहे. त्याचबरोबर भाड्याच्या ठिकाणी भाडे दर निश्चित करण्यासाठी चर्चा करणार आहे. मोठे डिफॉल्टर कोर्टात जात आहेत. त्यामुळे येस बँकेला कर्ज वसुलीत अडचणी येत आहेत. येस बँकेचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी राणा कपूर यांच्या कार्यकाळात, संचालनातील अनेक गैरप्रकारांनंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वात असलेल्या बँकांच्या गठबंधनातून भांडवल उभं करून येस बँक त्यावेळी वाचवण्यात आली होती. मार्चमध्ये कुमार यांना बँकेचे नवे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. सप्टेंबरच्या तिमाहीत बँकेचा नफा 21 टक्क्यांनी कमी झाला आहे.

प्रशांत कुमार यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितलं की, दुर्दैवाने बाब म्हणजे बँकेचे किंमतीवर कोणतेही नियंत्रण नाही. चालू आर्थिक वर्षात 2019-20 च्या तुलनेत परिचालन खर्च 20 टक्क्यांनी कमी करण्यासाठी जागतिक पातळीवरील सल्लागाराने अजेंडा सुचविला आहे. बँकेने यापूर्वीचं मध्य मुंबईतील इंडियाबुल्स फायनान्स सेंटरमध्ये दोन मजले सोडले आहेत. या व्यतिरिक्त, बँक सर्व 1,100 शाखांच्या भाड्यासंदर्भात नव्याने वाटाघाटी करीत आहे. या प्रक्रियेमुळे बँकेचे भाडे सुमारे 20 टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. (हेही वाचा - Yes Bank Case: येस बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी राणा कपूर यांचा लंडनमधील 127 कोटी रुपयांचा फ्लॅट 'ईडी'कडून जप्त)

दरम्यान, कामकाज तर्कसंगत करण्याच्या हेतूने बँक 50 शाखा बंद करीत आहे. यातील बर्‍याच शाखा जवळ-जवळ आहेत. त्यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात. याशिवाय एटीएमची संख्यादेखील कमी करण्याचा विचार आम्ही करत आहोत. (वाचा - Yes Bank Money Laundering Case: येस बँक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ED कडून कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांना अटक; मुंबईच्या विशेष कोर्टाने सुनावली दहा दिवसांची कोठडी)

सप्टेंबरच्या तिमाहीत, येस बँकेने 35 ग्रामीण शाखा बिजनेस करस्पोन्डेंट लोकेशन बदलले. यामुळे बँकेची परिचालन किंमत दरमहा 2 लाख रुपयांवरून घटून 35000 रुपये झाली आहे. व्यवसायात बदल झाल्यामुळे बँक आपल्या कर्मचार्‍यांना गरजेनुसार नवीन कामांमध्ये बसवित आहे. रेस्क्यू स्कीमचा एक भाग म्हणून, बँक कमीतकमी एका वर्षासाठी सर्व विद्यमान कर्मचार्‍यांना कामावर घेण्यास वचनबद्ध आहे, असंही प्रशांत कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.