HTLS 2022: भारतात महिलांच्या अडचणी कमी नाहीत; अनेक न्यायालयांमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृहेही नाहीत - CJI DY Chandrachud
D Y Chandrachud (PC- PTI)

HTLS 2022: आज हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिट 2022 (HTLS 2022) चा शेवटचा दिवस आहे. देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रचूड (CJI DY Chandrachud) यांनी या परिषदेत आपल्या भाषणादरम्यान न्यायव्यवस्थेसमोरील आव्हानांचा उल्लेख केला. यावेळी न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की, 'खटले प्रलंबित ठेवणे हे देशातील न्यायव्यवस्थेसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. संपूर्ण भारतात कायदेशीर व्यवसायाची रचना सरंजामशाही आहे. महिलांसाठी लोकशाही आणि गुणवत्तेवर आधारित बदलाची गरज आहे. भारतात आजही अनेक न्यायालयांमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृहेही नाहीत.'

हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिट 2022 मध्ये, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी न्यायव्यवस्थेतील आव्हाने आणि महिलांना भेडसावणाऱ्या कठीण परिस्थितीवर भाष्य केले. महिला आणि समाजातील मागासलेल्या समाजातील न्यायाधीशांच्या तुटवड्याबद्दल चिंता व्यक्त करताना सरन्यायाधीश म्हणाले, न्यायपालिकेत कोण प्रवेश करेल हे निश्चित करणारा पूल मुख्यत्वे कायदेशीर व्यवसायाच्या रचनेवर अवलंबून असतो. (हेहीव वाचा - Delhi High Court On CJI: दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली न्यायमूर्ती DY Chandrachud यांच्या सरन्यायाधीशपदी नियुक्तीविरोधातील याचिका)

भारतात अनेक न्यायालयांमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृहेही नाहीत -

न्यायव्यवस्थेत महिलांना भेडसावणाऱ्या आव्हानांबद्दल बोलताना सरन्यायाधीश म्हणाले की, अनेक न्यायालयांमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृहेही नाहीत. याशिवाय प्रलंबित खटल्यांची संख्या हे न्यायव्यवस्थेसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. CJI चंद्रचूड पुढे बोलतना म्हणाले, “जेव्हा आम्ही कोरोना काळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात सुनावणी सुरू केली तेव्हा अनेक महिला वकील पुढे आल्या. लाइव्ह स्ट्रिमिंगमुळे महिला वकिलांना याचा फायदा झाला.