Delhi High Court On CJI: दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली न्यायमूर्ती DY Chandrachud यांच्या सरन्यायाधीशपदी नियुक्तीविरोधातील याचिका
D Y Chandrachud (PC- PTI)

Delhi High Court On CJI: न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड (Justice DY Chandrachud) यांच्या सरन्यायाधीशपदी नियुक्तीविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) फेटाळून लावली आहे. तसेच या याचिकेवर एक लाखाचा दंड ठोठावत उच्च न्यायालयाने ही याचिका संविधानाच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी 9 नोव्हेंबर रोजी देशाचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी सकाळी राष्ट्रपती भवनात चंद्रचूड यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. सरन्यायाधीश यूयू ललित निवृत्त झाल्यानंतर चंद्रचूड यांची पुढील सीजेआय म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (हेही वाचा -Vande Bharat Express: देशाला मिळाली 5 वी वंदे भारत ट्रेन; पंतप्रधानांनी दाखवला हिरवा कंदील; कोणत्या मार्गावरून धावणार आणि भाडे किती असणार? जाणून घ्या)

DY चंद्रचूड हे भारताचे 16 वे सरन्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. वडिलांच्या निवृत्तीच्या 37 वर्षानंतर त्यांचा मुलगा न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड हे CJI झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच वडिलांनंतर मुलगाही सरन्यायाधीश बनला आहे. वायव्ही चंद्रचूड यांचा CJI म्हणून सर्वात मोठा कार्यकाळ आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून डीवाय चंद्रचूड यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय दिले. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने नुकतेच नोएडातील सुपरटेक ट्विन टॉवर्स पाडण्याचे आदेश दिले होते.

याशिवाय, न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने 9 नोव्हेंबर 2019 रोजी अयोध्येतील राम मंदिरावर एकमताने ऐतिहासिक निर्णय दिला. या निकालात सुप्रीम कोर्टाने केंद्राला सुन्नी वक्फ बोर्डाला मशीद बांधण्यासाठी पाच एकरचा भूखंड देण्याचे निर्देश दिले.