Delhi Water Crisis: दिल्लीत पाणी प्रश्नावरून भाजप आक्रमक; महिला कार्यकर्त्यांची आप मंत्री आतिशी मारलेना यांच्या घराबाहेर मडके फोडत निदर्शने

दिल्लीतील पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून अरविंद केजरीवाल सरकारच्या विरोधात भाजप महिला कार्यकर्त्यांनी आप मंत्री आतिशी यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली.

Delhi Water Crisis: दिल्लीत पाणी प्रश्नावरून भाजप आक्रमक; महिला कार्यकर्त्यांची आप मंत्री आतिशी मारलेना यांच्या घराबाहेर मडके फोडत निदर्शने
Photo Credit -X

Delhi Water Crisis: दिल्लीत पाणी प्रश्न पेटला आहे. अस्वच्छ पाणी पुरवठा (Water Crisis) वरून भाजप(BJP) महिला कार्यकर्त्यांनी दिल्ली सरकारला घेरले आहे. महिला कार्यकर्त्यांनी आप मंत्री आतिशी मारलेना यांच्या निवासस्थानी निदर्शने केली. महिलांनी मटका फोडो आंदोलन केले. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आदोलनस्थळी जोरदार  फलकबाजीही करण्यात आली आहे. त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. (हेही वाचा:Delhi Weather Update: दिल्लीत सर्वाधिक तापमानाची नोंद; पारा 52.3 अंश सेल्सिअसवर पोहोचला )

पहा पोस्ट-

(The above story first appeared on LatestLY on May 30, 2024 04:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).