Photo Credit -X

UP Police: मेटाच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लेटफॉर्म यांच्या मदतीने उत्तर प्रदेश पोलीसांनी गेल्या 1.5 वर्षात 457 लोकांना आत्महत्येपासून रेखल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून त्याबाबतची माहिती दिली. 1 जानेवारी 2023 ते 15 जून 2024 पर्यंतचा हा आकडा असून, यात पोलिसांनी पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना तत्काळ माहिती देत आत्महत्या रोखल्या. तसेच थेट संवादाद्वारे प्रभावीपणे आत्महत्या रोखल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा: UP Shocker: तलावात आंघोळ करणाऱ्या एकाच कुटुंबातील तीन मुलींचा बुडून मृत्यू)

जेव्हा जेव्हा फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर आत्महत्येशी संबंधित पोस्ट दिसून येते तेव्हा मेटा कंपनीचे मुख्यालय फोन आणि ईमेलद्वारे पोलिसांच्या सोशल मीडिया सेंटरला त्वरित अलर्ट करतात त्यानंतर पोलिस घटनास्थळी जाऊन आत्महत्या रोखतात. मुख्यालयाचे सोशल मीडिया सेंटर, 24x7 कार्यरत आहे, हे अलर्ट प्राप्त झाल्यावर त्वरीत पोलिस कार्य करतात.

उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स सर्व्हरसह एकत्रित केलेले, ती माहिती कोठून पोस्ट झाली त्याबाबत माहिती घेतात आणि प्रकरण 'UP-112' आणि संबंधित जिल्ह्याकडे त्वरित कारवाईसाठी पाठवता. त्यानंतर 'UP-112' किंवा स्थानिक पोलीस नंतर Meta ने दिलेले लोकेशन वापरून पीडित आणि त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचतात.1 जानेवारी 2023 ते 15 जून 2024 या कालावधीत सोशल मीडिया सेंटरला मेटा कंपनीकडून जवळपास 740 अलर्ट प्राप्त झाले, परिणामी 457 लोकांचे जीव वाचले.