अयोद्धेमध्ये (Ayodhya) 22 जानेवारी 2024 दिवशी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यासाठी तीन मूर्त्यांमधून रेखीव मूर्तीची निवड झाल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकमधील मूर्तिकार अरूण योगिराज (Arun Yogiraj) यांनी साकारलेल्या मूर्तीवर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. यामुळे योगिराज सह त्याचे कुटुंब आणि कर्नाटकवासिय देखील आनंद साजरा करत आहे. रामलल्लांच्या मूर्तीसाठी अंतिम टप्प्यात बाजी मारणारे अरूण यांच्या रेखीव मूर्तींनी यापूर्वीही मनं जिंकली आहेत. देशाच्या पंतप्रधानांनीही अरूणची भेट घेत त्यांच्या पाठीवर थाप दिली आहे. मग जाणून घ्या हे प्रसिद्ध शिल्पकार अरूण योगिराज कोण?
कोण आहेत मूर्तिकार अरूण योगिराज?
अरूण योगिराज हे मूळचे कर्नाटकातील मैसूर मधील आहेत. त्यांना मूर्तिकलेचा वारसा घरातूनच मिळाला आहे. त्यांची पाचवी पिढी सध्या या मूर्तिकलेमध्ये काम करत आहे. अरूण आपल्या कलेसाठी केवळ कर्नाटकात नव्हे तर देशात प्रसिद्ध आहेत. अरूण यांचे आजोबा बसवन्ना देखील प्रसिद्ध शिल्पकार होते. त्यांना मैसूरच्या राज घराण्याकडून तेव्हा राजाश्रय मिळाला होता.
अरूण यांना लहानपणापासूनच मूर्ति घडवण्याचे वेड होतं. त्यांना ही कला वारशामध्येच मिळाली आहे. अरूण यांनी एमबीए केले आहे. त्यानंतर त्यांनी एका खाजगी कंपनीत काम देखील केले. पण मूर्तिकलेने त्यांना पुन्हा आपल्याकडे खेचले. 2008 मध्ये त्यांना नोकरीवर पाणी सोडत शिल्पकलेमध्येच आपला जम बसवण्यास सुरूवात केली. त्यांच्या मेहनतीने रंग दाखवले आणि स्वतः कलेने त्यांची ओळख निर्माण झाली. नक्की वाचा: Ayodhya Ram Mandir Aarti Passes: अयोद्धा राम मंदिरात ऑनलाईन, ऑफलाईन आरती पास देण्यास सुरूवात; इथे पहा दर्शन, आरतीच्या वेळा आणि पास कसा मिळवाल?
अरूण योगिराज यांच्या देशातील महत्त्वाच्या मूर्त्या कोणत्या?
अरूण योगिराज यांनी इंडिया गेट वर लावण्यात आलेली स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांची 30 फीट उंचीची मूर्ती साकारली आहे. हीच 2 फीटची मूर्ती त्यांनी पंतप्रधान मोदींनाही भेट दिली होती.
अरूण योगिराज यांनी केदारनाथ मध्ये आदि शंकराचार्य यांची 12 फीट उंचीची मूर्ती बनवली आहे. मैसूर मध्ये स्वामी रामकृष्ण परमहंस यांची प्रतिमा देखील त्यांनी साकारली आहे. मैसूरच्या राजांची 14.5 फीट उंचीची पांढर्या अमृतशिला मूर्तीलाही त्यांनी घडवलं आहे. तसेच मैसूर मध्ये चुंचनकट्टे मध्ये हनुमानाची 21 फीट उंचीची मूर्ती त्यांनी साकारली आहे. डॉ.बीआर आंबेडकर यांची 15 फीट उंचीची प्रतिमा देखील त्यांचीच कलाकृती आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
आता अरूण यांनी साकारलेली रामलल्लांची मूर्ती विधिसोहळ्यामध्ये सर्वांसमोर येणार आहे. 17 जानेवारीला त्याची पहिली झलक पहायला मिळू शकते. 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठेपूर्वी 16 जानेवारीपासून विविध विधिंना सुरूवात होणार आहे.