Bus Plunges Uttarkashi PC twitter

Uttarakhand News: उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर गंगनानीजवळ बस दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत आठ प्रवाशांचा मृत्यू झाला आणि इतर २७ जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एसडीआरएफ कमांडंट मणिकांत मिश्रा यांनी एएनआयला सांगितले की, गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावरील गंगनानी बस अपघातात बसमधील 8 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 27 प्रवासी जखमी झाले आहेत, त्यापैकी 10 प्रवासी गंभीर जखमी आहेत.

सर्व जखमींना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. अशी माहिती समोर आली आहे. घटनास्थळी बचाब कार्य दाखल झालं जखमी प्रवाशांना बाहेर काढले आणि त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सद्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. बचाव कार्याच्या अधिकाऱ्यांने सांगितले की, बस मध्ये ३२ ते ३० प्रवाशी होते. त्यापैकी ८ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलीस अधिकारी एसपी आणि डीएम दाखल झाले.

ही बस ५० फूट खोल दरीत कोसळली आहे. या दुर्घटनेत२७ जण जखमी झाले आहे. बस प्रवाशी गंगोत्री या ठिकाणी जात होते.दरम्यान ही घटना घडली आहे. गंगोत्री महामार्गावरील गंगनानी येथे झालेल्या बस अपघातातील जखमींवर योग्य उपचाराची व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अतिरिक्त मुख्य सचिव राधा रतुरी यांना दिले आहेत.