Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे एका तरुणाने स्वत:वर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी घडली. तरुणाने पोलिस अधिक्षक कार्यालयाबाहेर हे कृत्य केले आहे. ज्यामुळे संपुर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे. श्री चंद्र पासी असं तरुणाचे नाव आहे. या घटनेत तरुण गंभीर भाजला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहे. श्री चंद्र पासी (28) हे गंभीर भाजल्याने सध्या उन्नाव जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. (हेही वाचा - पगारासाठी प्राथमिक शाळेतील शिक्षकाचे शोले स्टाइल आंदोलन, फाईल क्लिअर होईपर्यंत मोबाईल टॉवरवर मांडला निवारा)
मिळालेल्या माहितीनुसार, पासीने त्याच्या शेजाऱ्यांविरुद्ध SC/ST कायदा आणि हिंसाचार, हल्ले आणि जातीय अपशब्द वापरण्याशी संबंधित इतर कलमांतर्गत 18 ऑक्टोबर रोजी एफआयआर दाखल केला होता. त्याने आपल्या तक्रारीत मुनीर, साबीर, अनीस, मुमताज आणि सबिहा यांची नावे घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी पुराव्यांशी छेडछाड केल्याबद्दल चंद्र पासी यांना राग आला, संतप्त झालेले चंद्र यांनी पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
उन्नाव के SP ऑफिस में युवक ने किया आत्मदाह। #Unnao #UPPolice @NBTLucknow pic.twitter.com/ndnPeyXjZu
— Praveen Mohta (@MohtaPraveenn) December 27, 2023
सीओ पूर्वा यांनी विरोधकांकडून पैसे घेतल्याच्या पाच दिवसांनंतर, विरोधी पक्षाच्या महिलेच्या तक्रारीनंतर त्यांच्या आणि भाऊ श्रीचंद्र आणि कुटुंबातील इतर सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहे त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहे.