UP: शाळेत मुख्याध्यापकांच्या खुर्चीवरून गदारोळ, प्रयागराज येथील घटना, पहा व्हायरल व्हिडिओ
Prayagraj PC TW

UP Video: उत्तर प्रदेशातील प्रयागराज बिशप जॉन्सन गर्ल्स स्कूलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच, अनेकांना प्रश्न पडला आहे की हा व्हिडिओ शाळेतला असेल का? व्हिडिओत मुख्यध्यापिकाच्या खुर्चीबाबत शाळेत गदरोळ घालत आहे. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिसाद दिला. मुख्यध्यपाकाना खुर्चीवरून हकलवण्याचा प्रयत्न करत आहे.  (हेही वाचा- एकतर्फी प्रेमात ओलांडल्या सर्व मर्यादा! मुलीच्या मानेवर कात्रीने केले 6 वार, वर्धा जिल्ह्यातील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओत दिसल्याप्रमाणे मुख्याध्यापक बदलण्याच्या या पध्दतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आला. ही घटना बिशप  जॉन्सन गर्ल्स हायस्कूलची आहे. या शाळेत मंगळवारी मॉरिस एडगर डॅन आपल्या समर्थकांसह मुख्याध्यापकांच्या कार्यालयात बळजबरीने घुसले. त्यानंतर  त्यांच्या समर्थकांनी विद्यमान मुख्यध्यापकांना खुर्चीवरून जबरदस्तीने हटवण्यास सुरुवात केली.  या घटनेबाबत, शाळेच्या माजी मुख्याध्यापकांनी पोलिसांकडे तक्रार केली असून बिशप मॉरिस एडगर डॅन आणि इतर अनेक लोकांवर गैरवर्तन, धमक्या आणि दरोडा टाकल्याचा आरोप केला आहे.

आता पर्यंत मादी बिशप पीटर बलदेव यांची मुलगी पारूल सोलोमन या शाळेच्या मुख्यध्यापिका होत्या. या घटनेबाबत पारूलने सांगितले की, शाळेच्या व्यवस्थापनाबाबतचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. पारूल पुढे म्हणाली की, मंगळवारी सकाळी शाळेच्या कार्यालयात बसली होती त्यावेळी हे लोक आत आले आणि त्यांनी गोंधळ घातला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.