पॉर्न साईट्समुळे (Porn Videos) वाढणारी विकृती आणि गुन्हेगारी लक्षात घेऊन सरकारने बहुतांश साईटवर बंदी घातली आहे. मात्र, तरीही या साईट्स वेगवेगळ्या माध्यमातून पाहण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. यातच उत्तर प्रदेश पोलिसांनी (Uttar Pradesh Police) 1090 नावाची एक विशेष टीम (Women Power Line 1090) तयार केली आहे. दरम्यान, जर एखाद्या व्यक्तीने इंटरनेटवर पॉर्न व्हिडिओ सर्च केला तर, त्याला लगेच एक मॅसेज पाठवण्यात येणार आहे. पॉर्नच्या दुनियेची चटक लागलेल्या मंडळींना वेळीच सावध करण्यासाठी यूपी पोलीस कठोर पावले उचलली जात असल्याचे समजत आहे. उत्तर प्रदेश एडीजी नीरा रावत यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
उत्तर प्रदेशात महिलांच्या सुरक्षेसह विविध मुद्यावरून वेळोवेळी वाद होत आहेत. दरम्यान, महिलांवर होणाऱ्या आत्याचाराच्या संख्येत घट करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी 1090 योजना सुरु केली आहे. याचबरोबर पोलीस या योजनेतून लोकांची मानसिकता बदलण्यावर जोर देत आहेत. एखादी व्यक्ती इंटरनेटवर पॉर्न साईट्स पाहत असेल तर, त्याची तात्काळ माहिती या टीमला मिळणार आहे. सध्या उत्तर प्रदेशातील सहा जिल्ह्यात ही योजना राबवली जात असून याला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे रावत यांनी सांगितले आहे. हे देखील वाचा- ''संमती शिवाय SEX संबंधात कंडोम काढून टाकणे अवैध'' कायदा अमलात आणणारे कैलिफोर्निया ठरणार अमेरिकेतील पाहिले राज्य
उत्तर प्रदेशात 11.60 कोटी इंटरनेटचा वापर करीत आहेत. यात 16 ते 64 वयो गटातील व्यक्तींचा समावेश आहे. ग्रामीण भागात 69 टक्के युजर्स आहेत. एक व्यक्ती जवळपास 6 तास मोबाइल वापरत असल्याचे सिद्ध झाले आहे.