मुंबई मध्ये 18,19 आणि 21 जानेवारी दिवशी Coldplay Concert होणार आहे. या कॉन्सर्ट्स नवी मुंबईच्या डॉ. वाय पाटील स्टेटियम मध्ये होणार असल्याने आता त्याच्या तयारीला सुरूवात झाली आहे. मोठ्या संख्येत तरूणाई, संगीतप्रेमी या कॉन्सर्ट्स साठी नवी मुंबईत येणार असल्याने नवी मुंबई ट्राफिक विभागाकडून या भागात वाहतूकीमध्ये बदल केले आहेत. स्टेडियम जवळच्या भागात वाहतूक कोंडी टाळण्यासठी पोलिसांनी काही सूचना जारी केल्या आहेत.
पोलीस उपायुक्त (वाहतूक), तिरुपती काकडे यांनी मोटार वाहन कायदा, कलम 115, 116(1)(a)(b), आणि 117 अंतर्गत आदेश जारी केला आहे. या आदेशात अवजड वाहनांना बंदी आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व प्रकारच्या जड आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश, प्रवास किंवा कोणत्याही रस्त्यावर पार्किंग करण्यास बंदी आहे. असे सांगण्यात आले आहे.
वाहतूकीचे निर्बंध कधी लागू असतील?
नवी मुंबई मध्ये वाहतूकीचे हे निर्बंध 18, 19 आणि 21 जानेवारी रोजी दररोज दुपारी 2 ते 12 या वेळेत लागू होतील. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने, पोलिसांची वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, सरकारी वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. अधिकृत इव्हेंट मॅनेजमेंट पास असलेल्या वाहनांनाही परवानगी असेल. नक्की वाचा: Coldplay Mumbai Concert 2025: कोल्डप्ले मुंबई कॉन्सर्टदरम्यान गगनाला भिडले शहरातील हॉटेल्सचे दर; एका रूमसाठी आकारले जात आहेत 70,000 रुपये.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग
मुंबईहून नवी मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना वाशी पुलाऐवजी ऐरोली मार्गाने जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुण्याच्या दिशेने प्रवास करणारे प्रवासी मुंब्रा बायपास वापरू शकतात, तर स्थानिक रहदारीला प्रतिबंधित तासांमध्ये नवी मुंबईचे अंतर्गत रस्ते वापरण्याचे आवाहन आहे. सायन-पनवेल महामार्ग (नेरुळ मार्ग), उरण रोड, पाम बीच रोड (नेरुळ जंक्शन) आणि वाशीकडे जाणारा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे टाळावेत.