PUBG Mobile: पबजी मोबाईलने 2025 च्या सुरूवातीलाच 2 लाख खाती आणि नऊ हजार डिव्हाइस निलंबित केले आहेत. एक्सवरील गेमिंग (Game)अकाऊंटवर ही माहिती दिली. त्याशिवाय, 5 लाख फॉलोअर्स आणि व्ह्यूजसह 2 हजाराहून अधिक ऑनलाइन चीट जाहिराती काढून टाकल्या आहेत. पबजी (PUBG) मोबाईलने त्यांच्या अँटी-चीटिंग अहवालात याची माहिती दिली. बंदी घातलेल्या डिव्हाइसमध्ये 59% ब्रॉन्झ गेमर आणि इतर अनेक गोष्टी समाविष्ट होते. बंदी घातलेल्यांमध्ये चीट सॉफ्टवेअर स्थापित करणारे आणि गेम हॅक करणारे खाते होते. पबजीने म्हटले आहे की त्यांनी डिस्कॉर्ड, फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम आणि टिकटॉकवर पोस्ट केलेल्या ऑनलाइन चीटिंग कंटेंटवर बंदी घातली आहे.

2.93 लाखांहून अधिक खाती बंद

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)