''संमती शिवाय SEX संबंधात कंडोम काढून टाकणे अवैध'' कायदा अमलात आणणारे कैलिफोर्निया ठरणार अमेरिकेतील पाहिले राज्य

जेव्हा दोन व्यक्तींमध्ये शारीरिक संबंधाविषयी बोलायचे झाले तर लैंगिक गोष्टींमध्ये दोन्ही व्यक्तींकडून उत्साह आणि सहमती असणे गरजेचे असते. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर,संमती म्हणजे काहीतरी करण्यासाठी स्वैच्छिक करार म्हणून परिभाषित केले जाते.या अत्यंत आवश्यक बाबीवर प्रकाश टाकत कैलिफ़ोर्निया मध्ये याबाबत नवा कायदा अस्तित्वात येत आहे.ज्यामध्ये लैंगिक संबंधावेळी संमतीविना कंडोम काढून टाकणे अवैध मानले जाईल. हे ही वाचा: ( पॉर्न स्टार Stormy Daniels चा मोठा खुलासा; Donald Trump सह SEX संबंध माझ्या आयुष्यातले सर्वात वाईट 90 सेकंद )

जर हा कायदा अस्तित्वात आला तर असा मोठा आणि महत्वाचा कायदा करणारे कैलिफ़ोर्निया अमेरिकेतील पाहिले राज्य ठरले जाईल. हा कायदा पास झाल्यावर, नवीन बिल AB 453 तर पीड़ित व्यक्ति भावनिक आणि शारीरिक हानी पोहोचवण्यासाठी दावे करू शकेल असे Insider.com मध्ये सांगण्यात आले आहे.असेंब्ली बिल AB 453  च्या कायद्यानुसार यात अशा लोकांचा समावेश आहे जे जाणूनबुजून "एका कंडोमला काढून टाकल्या गेलेल्या लैंगिक संबंधास कारणीभूत असतात,आणि दूसरा यादरम्यान मौखिक पद्धतीने कंडोम काढायची सहमती देत नाही. (China: ऐकावे ते नवलच! नाक आणि घशासोबतच Anal Swabs घेऊन होत आहे कोरोना विषाणूची चाचणी; देशातील तज्ञांनी केले कौतुक )

डेमोक्रेटिक असेंबली सदस्य क्रिस्टीना गार्सिया ने डेली मेलसही बोलताना सांगितले की,'मी 2017 पासून "Stealthing" या विषयावर काम करत आहे.आणि मी ठरवले की मी तो पर्यंत थांबणार नाही जो पर्यंत या कायद्याची अंबलबजवणी होत नाही. हे असे घृणास्पद आहे की ऑनलाइन समुदाय असे आहेत की जे, त्यांच्या जोडीदाराच्या संमतीशिवाय कंडोम काढून टाकण्यासंबंधी सल्ला देतात, परंतु हा गुन्हा आहे हे स्पष्ट करण्यासाठी कायद्यात काहीही नाही'.