पॉर्न स्टार Stormy Daniels चा मोठा खुलासा; Donald Trump सह SEX संबंध माझ्या आयुष्यातले सर्वात वाईट 90 सेकंद

पोर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी शारीरिक संबंधांबद्दल अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. ट्रम्प यांच्यातील नात्यातील 90 सेकंद हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट क्षण होता, असे स्टॉर्मी डॅनियल यांनी म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्पचे माजी सहकारी मायकेल कोहेन समवेत कुल्पा या पॉडकास्ट प्रोग्राम दरम्यान स्टॉर्मी डॅनियल्सने अनेक खुलासे केले आहेत ज्यामुळे अमेरिकेच्या राजकारणात पुन्हा वादळ येऊ शकते.अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही हे कबूल केले आहे की पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सशी त्याचे शारीरिक संबंध आहेत. स्टॉर्मी डॅनियल्सने पॉडकास्ट इव्हेंट दरम्यान डोनाल्ड ट्रम्पचा माजी सहकारी मायकेल कोहेन शी संवाद साधला आणि सांगितले की,डोनाल्ड ट्रम्पशी शारीरिक संबंध असताना तो काळ इतका वाईट होता की पॉर्न स्टार स्वतःचा द्वेष करू लागली. (Sex Power वाढवणाऱ्या Viagra गोळ्यांची अवैधपणे तस्करी; शिकागो विमानतळावर 3,200 गोळ्यांसह भारतीयाला अटक, अमेरिकेच्या मित्रांसाठी घेऊन जात होता ) 

स्टॉर्मी डॅनियल्स म्हणाली की तिला डोनाल्ड ट्रम्पकडून कोणताही धोका न्हवता तरीही त्या वेळेस डोनाल्ड ट्रम्प यांना सोडून त्या खोलीतून पळून जावे अशी तिची इच्छा झाली होती.स्टॉर्मी डॅनियल डोनाल्ड ट्रम्पसोबतच्या क्षणाबद्दल सांगताना म्हणाली की, त्या घटनेनंतर लोक माझा द्वेष करीत होते.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी शारीरिक संबंध असल्याचा आरोप करून स्टॉर्मी डॅनियल्सने सन 2016 मध्ये एक खळबळजनक खुलासा केला होता. 2016 च्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचे स्टॉर्मी डॅनियल्सने उघड केले होते. मात्र, याचा खुलासा होऊ नये यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टॉर्मी डॅनियल्सला एक लाख 30 हजार डॉलर्सची प्रचंड मोठी रक्कम दिली.

त्यावेळी हे पैसे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले सहकारी मायकेल कोहेन यांना स्टॉर्मी डॅनियल्स ला देण्यास दिले होते. त्यानंतर स्टॉर्मी डॅनियलने याबद्दल तक्रार केली. याचा परिणाम म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचे सहाय्यक मायकेस कोहेन यांना तुरूंगात पाठविण्यात आले. नंतर स्टॉर्मी डॅनियलने आपल्या पुस्तकात डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर घालवलेल्या क्षणांबद्दल अनेक खळबळजनक आणि धक्कादायक खुलासे केले.