अमेरिकेच्या शिकागो विमानतळावर एका भारतीय व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्या व्यक्तीवर अवैधपणे 3,200 व्हायग्रा (Viagra) गोळ्या आयात केल्याचा आरोप आहे. त्यांची किंमत सुमारे 96 हजार अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. या व्यक्तीने सांगितले की, भारतात या गोळ्या वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळत असल्याने तो या गोळ्या आपल्या मित्रांसाठी घेऊन जात होता. ही माहिती एका अधिकृत निवेदनात देण्यात आली आहे. अमेरिकेच्या सीमाशुल्क व सीमा संरक्षण विभागाने (CBP) शुक्रवारी प्रवाश्याचे नाव जाहीर न करता सांगितले की, ही व्यक्ती भारतातून अमेरिकेत परत आली असून सामानाच्या तपासणी दरम्यान त्याच्याकडून इतक्या मोठ्या प्रमाणत गोळ्या जप्त केल्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायग्रा गोळ्या आणण्याबाबत या प्रवाशाला कोणतेही समाधानकारक उत्तर देता आले नाही, त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. सीबीपीने निवेदनात म्हटले आहे की, 'वस्तूंच्या तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांनी या व्यक्तीकडून सिल्डेनाफिल सायट्रेट (1000 मिलीग्राम) च्या 3,200 गोळ्या जप्त केल्या. जेव्हा त्या प्रवाशाला त्याच्याकडून इतक्या गोळ्या कशा आल्या असे विचारले असता, आपण आपल्या मित्रांसाठी या गोळ्या घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले. भारतामध्ये या गोळ्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळतात त्यामुळे ही व्यक्ती या गोळ्या भारतामधून घेऊन जात होता. (हेही वाचा: Sex Tips For Men: महिलांना सेक्स दरम्यान बेडवर कोणत्या गोष्टी हव्याहव्याशा वाटतात? वाचा सविस्तर)
दरम्यान, याआधी डिसेंबरमध्ये मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे रुग्णालयात दाखल केलेल्या एका युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. व्हायग्रा घेतल्यानंतर तरूणाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. या युवकाने व्हायग्राच्या 10 गोळ्या खाल्ल्याचे सांगण्यात आले होते.