PM Narendra Modi Live at Navi Mumbai: नवी मुंबई येथील खारघर येथे इस्कॉन प्रकल्प असलेल्या श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या मंदिराच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान स्वत: उपस्थित राहत असून हा कार्यक्रम लाईव्ह प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमात पंतप्रधानांचे भाषण आपण येथे लाईव्ह पाहू शकता. दरम्यान, नऊ एकरांवर पसरलेल्या या प्रकल्पात अनेक देवतांचे मंदिर, वैदिक शिक्षण केंद्र, प्रस्तावित संग्रहालये आणि सभागृह, उपचार केंद्र इत्यादींचा समावेश आहे. वैदिक शिकवणींद्वारे वैश्विक बंधुता, शांती आणि सुसंवाद वाढवणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे, असे मंदिर प्रशासन आणि इस्कॉनने म्हटले आहे.

पंतप्रधानांचे भाषण

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)