ISKCON Priest Beaten in Vasai: वसईतील इस्कॉन मंदिरात शुक्रवारी, 13 डिसेंबर रोजी मंदिरात काम करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाने पुजाऱ्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली. महिलेने पुजाऱ्यावर अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर तिच्या कुटुंबाने प्रकरण स्वतःच्या हातात घेतले, परिणामी हिंसक संघर्ष निर्माण झाला. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वायाराल होत आहे. फुटेजमध्ये महिलेचे कुटुंब काही महिलांसह पुजारी उपस्थित असलेल्या हॉलची तोडफोड करत, तसेच पुजाऱ्याला थप्पड मारताना, मुक्का मारताना आणि चप्पलने मारहाण करताना दिसत आहे. या घटनेदरम्यान पुजाऱ्याशी संबंधित इतर व्यक्तींवरही हल्ला करण्यात आला. व्हिडीओमध्ये ते हात जोडून माफीची याचना करतानाही दिसत आहेत. वृत्तानुसार, भांडणानंतर पुजाऱ्याला कुटुंबीयांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. (हेही वाचा: Kolkata Woman Brutally Murdered: एकतर्फी प्रेमास नकार, मेहुण्याकडून मेहुणीची हत्या, कोलकाता शहरातील घटना)

वसईत इस्कॉनच्या पुजाऱ्याला मारहाण-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)