Dog Attack Shocking Video: पालघरमध्ये वाढली कुत्र्यांची दहशत; डहाणू येथे सोसायटीत मोकाट कुत्र्याचा दोन महिलांवर जीवघेणा हल्ला (Watch)
माहितीनुसार, रामवाडी ताजी नगरमध्ये एका कुत्र्याने अचानक महिलांच्या अंगावर झडप घातली. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या भीषण घटनेत दिसत आहे की, कुत्रा आधी एका महिलेला चावण्याचा प्रयत्न करतो, ती महिला कशीबशी स्वतःची सुटका करून घेते, त्याचवेळी कुत्रा तिथे उपस्थित दुसऱ्या एका वृद्ध महिलेवर हल्ला करतो.
हल्ली अगदी दररोज कुत्र्याने किंवा कुत्र्यांच्या गटाने लोकांवर हल्ला केल्याच्या घटना समोर येत आहेत. आता पालघरमध्ये अशा कुत्र्यांची दहशत वाढल्याचे दिसत आहे. डहाणू येथे एका सोसायटीत मोकाट कुत्र्याने वृद्ध महिलेसह अन्य एका महिलेवर जीवघेणा हल्ला केला आहे. याबाबतचा एका धक्कादायक व्हिडीओही समोर आला आहे. माहितीनुसार, रामवाडी ताजी नगरमध्ये एका कुत्र्याने अचानक महिलांच्या अंगावर झडप घातली. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या भीषण घटनेत दिसत आहे की, कुत्रा आधी एका महिलेला चावण्याचा प्रयत्न करतो, ती महिला कशीबशी स्वतःची सुटका करून घेते, त्याचवेळी कुत्रा तिथे उपस्थित दुसऱ्या एका वृद्ध महिलेवर हल्ला करतो. यावेळी ती महिला जमिनीवर खाली पडते. यामध्ये वंदना लोहार नावाची वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. यानंतर आता डहाणू नगरपरिषदेने भटक्या कुत्र्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. (हेही वाचा: World's Most Expensive Dog 'WolfDog': बेंगळुरू येथील व्यक्तीने खरेदी केला लांडगा आणि कुत्र्याचे मिश्रण असलेला 'वुल्फडॉग' प्राणी; किंमत 50 कोटी)
Dog Attack Shocking Video:
पालघर में बढ़ता कुत्तों का आतंक... दहानू की सोसायटी में बुजुर्ग महिला समेत एक अन्य महिला पर खूंखार कुत्ते का जानलेवा हमला
रामवाड़ी ताजी नगर में बैठा कुत्ता अचानक महिलाओं पर झपट पड़ा. CCTV में कैद हुई इस खौफनाक घटना में वंदना लोहार नामक बुजुर्ग महिला गंभीर रूप से घायल हो गईं.… pic.twitter.com/RR0ZNwtZzA
— AajTak (@aajtak) April 7, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 07, 2025 02:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

