Representational Image (Photo Credits: File Photo)

पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीने एकतर्फी प्रेमातून 30 वर्षांच्या एका महिलेची निर्घृण हत्या (Kolkata Crime News) केली आहे. ही घटना कोलकाता येथील उच्चभ्रू टॉलीगंज (Woman Murdered Tollygunge) परिसरात घडली. रहमान लस्कर असे आरोपीचे नाव असून तो 30 वर्षांचा आहे. तो मृत महिलेचा जवळचा नातेवाईक आहे. पीडिता ही नात्याने त्याची मेहुणी लागते अशी माहिती आहे. आरोपीने गुन्हा कबुल केला आहे. त्याचे कथीतपणे तिच्यावर प्रेम होते. मात्र, तिने प्रेमास नकार दिल्याच्या रागातून त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. हत्या केल्यावर आरोपीने मृतदेहा छिन्नविच्छिन्न केला. पार्थविाचे तुकडे करुन ते पॉलिथीन पिशवीत भरुन कचऱ्याच्या ढिगाजवळ फेकले. कोलकाता पोलिसांनी (Kolkata Police) आरोपीस अटक केली आहे.

छिन्नविछिन्न चेहरा आणि मृततेहाचे तुकडे

पोलिसांनी सांगितले की, ही धक्कादायक घटना शुक्रवारी (13 डिसेंबर) सकाळी उघडकीस आली. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली की, जेव्हा रीजेंट पार्क परिसरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात चिन्नविच्छिन्न अवस्थेत असलेले आणि धडावेगळे केलेले मुंडके आढळून आले आहे. तसेच, पॉलिथीनच्या बॅगमध्ये काही मानवी शरीराचे काही तुकडेही दिसत आहेत. दरम्यान, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी हजेरी लावत तपास सुरु केला असता आणखी काही माहिती पुढे आली. पोलिसांना माहिती मिळाली की, शहर परिसरातील तलावाजवळ एका महिलेचा शिर नसलेला मृतदेह मह्णजेच केवळ धड आढळून आले आहे. धडाचेही काही अवयव गायब आहेत.

आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

दरम्यान, बांधकाम कामगार असलेल्या आरोपी लस्कर याने पोलसांकडे गुन्ह्याची कबुली देताना सांगितले की, त्याने घरगुती मदतीनस असलेल्या महिलेची हत्या केली. जी त्याची मेहुणी होती. त्याने तिची हत्या केवळ येवढ्याच कारणासाठी केली की, तिने त्याला भेट नाकारली आणि त्याचा नंबर ब्लॉक केला. पोलीस उपायुक्त बिदिशा कालिता यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्ती लस्कर यास भेटणे टाळत होती, ज्यामुळे तो संतप्त झाला. सदर महिला पतीपासून विभक्त राहते. लस्कर तिला मदत करण्याचा बाहाणा करत असे. महिलेचे काम संपल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी, लस्करने तिला त्याच्यासोबत परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत जाण्यास भाग पाडले. तिथे त्याने तिचा गळा दाबला, तिचा शिरच्छेद केला आणि तिच्या शरीराचे तीन तुकडे केले. त्यानंतर त्याने शरीराच्या अवयवांची वेगवेगळ्या ठिकाणी विल्हेवाट लावली.

आरोपीस अटक आणि तपास

दरम्यान, अज्ञात महिलेचा मृतदेह आणि धडावेगळे शीर, धड आढळल्यानंर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. शिवाय स्निफर कुत्रेही तैनात करुन माग काढला. दरम्यान, वैद्यकीय तपासणीत मृतदेहावर दुखापतीच्या खुणा आणि रक्ताचे डाग आढळून आले, ज्यामुळे डोके सापडल्यानंतर 12 तासांच्या आत हत्या झाल्याचे सूचित करण्यात आले. त्यामुळे हत्या करणारा व्यक्ती परिसरातीलच असावा याची पोलिसांना खात्री पटली. त्याच वेळी ग्रॅहम रोडवरील कचराकुंड्यातून गोळा केलेल्या पुराव्यांसह सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना एक व्यक्ती संशयास्पद रित्या पाहायला मिळाली. पोलिसांनी केलेल्या अधिक तपासात हा व्यक्ती लस्करच असल्याचे निष्पन्न झाले. तो दक्षिण 24 परगणाच्या डायमंड हार्बर परिसरातील ए बसुलडांगा येथील त्याच्या मूळ गावी राहात असल्याचीही माहिती मिळाली. जेथून पोलिसांनी त्याला अटक केली.