जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून पाऊस, वार्याचा जोर वाढला आहे. आज आयएमडी ठाणे आणि पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यावेळी वादळी वार्यासह पावसाच्या सरी बरसणार असल्याने नागरिकांना सुरक्षित राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मुंबई आणि आजुबाजूच्या भागात आज सकाळी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. 7 आणि 8 मे रोजी मुंबईसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यामध्ये विजांसह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. नक्की वाचा: Mumbai Rains: मुंबईकरांना उन्हाच्या काहिलीपासून दिलासा; शहरात मान्सून पूर्व सरींचे आगमन (Video).
ठाणे आणि पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी
🚨 Just in : IMD issues 'Orange Alert' for Thane & Palghar amid Thunderstorms & heavy rains with gusty winds. Stay safe, People residing in these areas! #MumbaiRains pic.twitter.com/zRGauFGLOw
— Mumbai Rains (@rushikesh_agre_) May 7, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)