Amit Shah took a holy dip at Triveni Sangam (फोटो सौजन्य - ANI)

Mahakumbh 2025: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांनी सोमवारी प्रयागराज (Prayagraj) येथील महाकुंभात (Mahakumbh 2025) त्रिवेणी संगमात (Triveni Sangam) साधू आणि संतांसह पवित्र स्नान केले. याआधी त्यांनी संतांशीही चर्चा केली. प्रशासनाने त्यांच्या आगमनाची विस्तृत तयारी केली होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांनी त्यांचे स्वागत केले. अमित शाह प्रथम सेल्फी पॉइंट अरैल घाटावर पोहोचले आणि नंतर त्यांच्या कुटुंबासह संगम स्नानासाठी रवाना झाले.

अमित शहा यांनी केली गंगा पूजा -

स्नान केल्यानंतर, अमित शहा गंगा पूजनात सहभागी झाले, ज्यामध्ये ऋषी-मुनींनी विधिवत पूजा केली. प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती यांचे मिलन होते. या त्रिवेणी संगमाला सनातन धर्मात मोक्ष आणि आत्मशुद्धीचे प्रतीक मानले जाते. (हेही वाचा -Maha Kumbh 2025: अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांनी प्रयागराज महाकुंभात केले स्नान, येथे पाहा व्हायरल व्हिडीओ)

अमित शहा त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करताना - 

अमित शहा यांनी यापूर्वी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केले होते की, 'महाकुंभ' हे सनातन संस्कृतीच्या अखंड प्रवाहाचे एक अद्वितीय प्रतीक आहे. कुंभ हा सुसंवादावर आधारित आपल्या शाश्वत जीवन तत्वज्ञानाचे प्रतिबिंब आहे. आज, पवित्र प्रयागराज शहरात एकता आणि अखंडतेच्या या महान उत्सवात, मी संगमात डुबकी मारण्यास आणि संतांचे आशीर्वाद घेण्यास उत्सुक आहे.'

दरम्यान, गुजरात दौऱ्यात अमित शहा यांनी महाकुंभाचे महत्त्व अधोरेखित केले होते. तसेच सर्वांना त्यात सहभागी होण्याची विनंती केली होती. त्यांनी म्हटले होते की, महाकुंभ शांती आणि सौहार्दाचा संदेश देतो, जिथे धर्म, जात किंवा पंथाचा कोणताही भेदभाव न करता सर्वांचे स्वागत केले जाते. शहा यांनी म्हटलं की, कुंभमेळ्यासारखा एकतेचा संदेश जगातील इतर कोणत्याही कार्यक्रमात दिसत नाही.