Nirmala Sitharaman Appeal: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे राज्य सरकार आणि बँकाना आवाहन, बँक कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढीची केली घोषणा
Nirmala Sitharaman | (Photo Credits: ANI)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी एक जिल्हा, एक निर्यात अजेंडा पुढे नेण्यासाठी बँकांना (Bank) राज्य सरकारांशी (State Government) जवळून काम करण्याचे आवाहन केले आहे. निर्मला यांनी बुधवारी सांगितले की, उत्तेजनाची गती कायम ठेवण्यासाठी बँका देशातील प्रत्येक जिल्ह्यात कर्ज देण्याचा प्रयत्न करतील. ते म्हणाले की एकत्रितपणे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी चांगली कामगिरी केली आहे. तसेच कोरोना साथीच्या काळात सेवा पुरवल्या असूनही, त्यांनी त्वरित सुधारात्मक कारवाई केली आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना निर्यातदारांच्या संस्थांशी संवाद साधण्याचा आग्रह करण्यात आला आहे. यामुळे बँका त्यांच्या गरजा समजून घेऊ शकतील. ते म्हणाले की, ईशान्य क्षेत्रासाठी रसद आणि निर्यातीवर भर देऊन बँकांना राज्यनिहाय योजना तयार करण्यास सांगितले आहे. हेही वाचा Oil India Limited Recruitment 2021: ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये 535 जागांसाठी भरती, आयटीआय उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

त्याचबरोबर, अर्थमंत्र्यांनी सांगितले की, पूर्व भारतातील राज्यांमध्ये ठेवी वाढत आहेत. परंतु पत आवश्यकता वाढवण्याची गरज आहे. बँकांना फिनटेक क्षेत्राला मदत करण्यास सांगितले आहे. वित्तीय सेवा विभागाचे सचिव म्हणाले की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला आता कर्मचाऱ्याच्या शेवटच्या पगाराच्या 30 टक्के इतकी पेन्शन मिळेल. पूर्वी ही पेन्शन रक्कम 9,284 रुपये होती. वित्तीय सेवा विभागाचे सचिव म्हणाले की, एनपीएस अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे योगदान 10 वरून 14 टक्के करण्यात आले आहे.

दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बँक कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. आतापर्यंत बँक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या पेन्शनवर दरमहा 9284 रुपये मर्यादा होती. जी आता काढून टाकण्यात आली आहे. भारताच्या महसूल सचिवांनी बुधवारी अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत सांगितले की, आता बँक कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या 30 टक्के रक्कम त्यांच्या कुटुंबांना पेन्शन म्हणून दिली जाईल. ते म्हणाले की, आता बँक कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या पेन्शनची रक्कम 30-35,000 रुपये असेल.