Adar Poonawalla-Covishield (Photo Credits: Twitter)

COVID-19 Vaccine: भारतात कोरोना विषाणूविरूद्ध (Coronavirus) लसीकरण चालू आहे. दरम्यान, भारतात तयार झालेल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) (एसआयआय) ने निर्मिती केलेली कोरोना लस AstraZeneca चे 1 कोटी डोस ला ब्रिटनला पाठविले जातील. न्यूज एजन्सी रॉयटर्सने यूके सरकारच्या हवाल्याने यासंदर्भात माहितीची माहिती दिली आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. सीरम इन्स्टिट्यूटने ऑक्सफोर्ड विद्यापीठासोबत गरीब आणि मध्यम-उत्पन्न देशांकरिता अ‍ॅस्ट्रॅजेनेका ही लस तयार केली आहे. न्यूज एजन्सी रॉयटर्सने फेब्रुवारी महिन्यात वृत्त दिले होते की, यूकेची मेडिसिन अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी (एमएचआरए) अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस यूकेमधून पाठविण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी सीरममध्ये उत्पादन प्रक्रियेची चाचणी करीत आहे. (वाचा - Chinese Hackers Target India Serum Institute, Bharat Biotech: भारतीय कोरोना लसीवर सायबर हल्ला, चीनी हॅकर्सकडून फॉर्म्युला चोरण्याचा प्रयत्न)

दरम्यान, बांगलादेश ते ब्राझील पर्यंत कमी आणि मध्यम उत्पन्न असणार्‍या देशांचा समूह एसआयआयच्या ब्रांडेड Covishield आणि AstraZeneca वर अवलंबून आहे. पाश्चात्य देशांकडून भारतात निर्मिती झालेल्या कोरोना लसीची मागणी वाढत आहे.