Lashkar-e-Taiba Terrorists Arrested: जम्मूमधील राजौरी जिल्ह्यातून लष्कर ए तोयबा च्या 3 दहशतवाद्यांना अटक
Security forces in Jammu and Kashmir | File image | (Photo Credits: IANS)

Lashkar-e-Taiba Terrorists Arrested: जम्मूमधील राजौरी जिल्ह्यातून (Rajouri District Of Jammu Region) लष्कर ए तोयबाच्या (Lashkar-e-Taiba) च्या 3 दहशतवाद्यांना पकडण्यात जवानांच्या संयुक्त पथकास (Joint Team Of Security Forces) यश आलं आहे. या दहशतवाद्यांकडून 1 लाख रुपये आणि दोन AK-56 रायफल, 2 पिस्तुल, 4 ग्रेनेड जप्त करण्यात आलं आहे.

या कारवाईसंदर्भात माहिती देताना जम्मू-काश्मीरचे आयजीपी मुकेश सिंह यांनी सांगितले की, या दहशतवाद्यांकडून दोन एके-56 रायफल, दोन पिस्तुलं, चार ग्रेनेड व एक लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेले दहशतवादी हे 19 ते 25 या वयोगटातील आहेत. (हेही वाचा -NIA Arrest Al-Qaeda Terrorists: पश्चिम बंगाल, केरळ राज्यातील विविध ठिकाणांहून 'एनआयए'ने अलकायदाच्या 9 दहशतवाद्यांना अटक)

दरम्यान, आज एनआयएने सकाळी पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये छापे टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत दहशतवादी संघटना अल कायदाशी निगडीत असलेल्या 9 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. यातील 6 जणांना पश्चिम बंगालमधून तर केरळमधून 3 जणांना अटक करण्यात एनआयएला यश आलं. भारताच्या विविध ठिकाणी हल्ला करण्याचा या दहशतवादी संघटनेचा कट होता. एनआयएने हा कट उधळून लावला आहे.