Terrorists | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

नॅशनल इन्वेस्टिगेशन एजन्सी ने पश्चिम बंगाल आणि केरळ राज्यातील विविध ठिकाणी छापेमारी केली. एनआयए (NIA) ने टाकलेल्या छाप्यांमध्ये अल कायदा (Al Qaeda) या दहशतवादी संघटनेच्या नऊ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या नऊपैकी पश्चिम बंगाल येथील मुर्शिदाबाद (Murshidabad) येथून 6 तर केरळ येथील एर्नाकुलम (Ernakulam) येथून 3 दहशतवाद्यांना तब्यात घेण्यात आले आहे. मुर्शीद हसन, याकूल बिस्वास, मोर्शफ हुसैन, नजमुस साकिब, अबू सूफियान, मैनुल मंडल, लियू यीन अहमद, अल मामून कमाल आणि अतितुर रहमान अशी या दहशतवाद्यांची नाव असल्याचे समजते.

प्राप्त माहितीनुसार, दहशतवाद्यांकडून डिजिकल उपकरणं, कागदपत्रं, जिहादी साहित्य, घातक शस्त्र, देशी शस्त्र, तसेच स्फोटंक तयार करण्याशी संबंधीत माहिती देणारे साहित्य आणि इतरही काही आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल आणि केरळ यांसह देशातील इतर भागात अलकायदाच्या आंतरराज्यीय मॉड्यूलबात एनाआयएला माहिती मिळाली होती. हे मॉड्यूल गर्दीच्या ठिकाणी जाऊन अंदाधूंद गोळीबारकरत निष्पाप लोकांमध्ये दहशत माजविण्याच्या विराचारत होते. त्यासाठी त्यांनी कट रचला होता. (हेही वाचा, Srinagar Encounter: जम्मू काश्मीर मधील श्रीनगर येथे झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; CRPF चे 2 जवान जखमी)

एनआयएने म्हटले आहे की, प्राथमिक माहितीनुसार या लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानातील अल काय दा दहशतवाद्यांकडून कट्टरतावादी बनविण्यात आले होते. तसेच, राष्ट्रीय राजधानी आणि इतर अनेक ठिकाणी हल्ले करण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात आले होते.

हेतू साध्य करण्यासाठी हे मॉड्यूल आवश्यक निधी उभारण्यासाठी सक्रीय झाले होते. जेणेकरुन शस्त्रास्थ खरेदी करता येतील. त्यासाठी या मॉड्यूलमधील काही लोक दिल्लीला जाण्याचीही योजना बनवत होते. राष्ट्रीय तपास यंत्रणा या दहशतवाद्यांना पोलिस कस्टडीत घेण्यासाठी आणि पुढील चौकशीसाठी पश्चिम बंगाल आणि केरळ कोर्टासमोर उभे करणार आहे.