Video: मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यात भाजप नेत्याने एका पोलिस अधिकाऱ्याला पोलिस ठाण्यात वर्दी उतरवण्याची धमकी दिली. या धमकी नंतर संपातलेल्या पोलिस अधिकारी (AIS) रागाच्या भरात वर्दीच फाडली. ही घटना पोलिस ठाण्यात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सद्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर पोलिस दलात एकच खळबळउ उडाली आहे. (हेही वाचा- कर्मचाऱ्याने पोळीवर थुंकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेस्टॉरंट मालकाला अटक)
मिळालेल्या माहितीनुसार, सिंगरौली जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यात भाजप नेत्याने काही अधिकाऱ्यांसमोर एका पोलिसाला धमकी दिली. तूझी वर्दी उरतवून टाकेन अशी धमकी दिल्यानंतर पोलिसाला राग अनावर झाला. संतापलेल्या पोलिसानी सर्वांसमोरच वर्दी फाडली. भाजपचे नगरसेवक आणि नेते अर्जून गुप्ता यांनी एएसआय विनोद मिश्रा यांना त्यांची वर्दी उतरवून टाकेन अशी धमकी मिळाली होती. अधिकाऱ्यांने रागाच्या भरात स्वत: चा गणवेश फाडला. यावेळीस सभेत उपस्थित इतर लोकांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ते चांगलेच संतापले होते.
पोलिस ठाण्यातच फाडली वर्दी
किसिको इतना मत डराओ की दर्र ही निकल जाइए #MadhyaPradesh
— GoldenEye_6 (@GoldenEye_6) September 16, 2024
समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना फेब्रुवारी महिन्यात घडली. या घटनेत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गणवेश फाडणाऱ्या पोलिसावर कारवाई केली होती.मात्र आता हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने नेटकरी भाजप नेत्यावर संतापले आहेत. हा संपूर्ण व्हिडिओ ट्विटरवर @GoldenEye_6 या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे.