प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

जंगलातून शहरात दाखल होणारी माकडांची टोळी संपूर्ण शहरभर वावरू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून माकडांच्या टोळ्या शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये दिसत आहेत. तसेच माकडांनी नागरिकांवर हल्ले (Monkey Attack) केल्याच्या अनेक घटना समोर येत आहे. यातच उत्तर प्रदेश येथून धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. माकडाच्या हल्ल्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी भाजप नेते अनिल कुमार चौहान यांच्या पत्नी सुषमा देवी (वय, 50) यांनी घराच्या छतावरून उडी मारली. ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुषमा या मंगळवारी रात्री त्यांच्या घराच्या छतावर गेले असता काही माकडांनी त्यांना घेरले. दरम्यान, माकडाच्या हल्ल्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी दुसऱ्या घराच्या मजल्यावरून खाली उडी मारली. ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा अनिल कुमार घरी नसल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. हे देखील वाचा- सामान्य माणसाला झटका! कपडे धुणे व अंघोळ करणे झाले महाग; HUL कडून Surf Excel, Rin, Lux, Lifebuoy च्या किंमतीमध्ये मोठी वाढ

पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये माकडांचा वावर धोकादायक रूप धारण करीत आहे. मथुरेमध्ये, महानगरपालिकेने 1 सप्टेंबरपासून 15 दिवसांचा कार्यक्रम सुरू केला आहे आणि शहरातील प्रमुख मंदिरांमधून माकडे पकडली जात आहेत.

कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात बांके बिहारी मंदिर परिसर, वृंदावन, चौबिया पारा आणि मथुरेच्या द्वारकाधीश मंदिर परिसरातील माकडांना पकडून वनक्षेत्रात सोडण्यात येईल, असे महापालिका आयुक्त अनुन्या झा यांनी सांगितले आहे.