Terrorists Shot Laborers in Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी टार्गेट किलिंग (Target Killing) ची घटना घडवली आहे. शनिवारी उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) दोन मजुरांना लक्ष्य करत दहशतवाद्यांनी (Terrorists) गोळीबार केला. जखमी मजुरांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, गोरखपूरचा छोटा प्रसाद आणि कुशीनगरचा गोविंद अशी मजुरांची नावे आहेत. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे. या घटनेनंतर फरार दहशतवाद्यांच्या शोधासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहाराजवळील राख मोमीन भागात गेल्या शनिवारी रात्री दहशतवाद्यांनी दोन मजुरांवर जवळून गोळीबार केला. या हल्ल्यात दोन्ही कामगार जखमी होऊन जमिनीवर पडले. ते ठार झाले असे समजून दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला. गोळीबाराचा आवाज ऐकून आसपासच्या परिसरात गस्त घालणारे सुरक्षा कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले. दोन्ही जखमी कामगारांना त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने अनंतनाग येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारासाठी नेले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इक्बाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही कामगारांची प्रकृती स्थिर आहे. (हेही वाचा - Earthquake in Delhi: दिल्ली आणि लगतच्या शहरांमध्ये जाणवले भूकंपाचे जोरदार धक्के, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण)
यापूर्वी 3 नोव्हेंबर रोजी अनंतनागमधील एका खासगी शाळेत काम करणाऱ्या दोन गैर-काश्मीरींना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. या गोळीबारात दोघेही जखमी झाले होते. जखमी कर्मचारी वानिहामा डायलगाम (बोंडियलगाम) येथील एका खाजगी शाळेत काम करत होते. दहशतवादी संध्याकाळी शाळेत पोहोचले आणि त्यांनी शाळेच्या बाहेर दोघांनाही लक्ष्य करत अंदाधुंद गोळीबार केला. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. यानंतर दहशतवादी घटनास्थळावरून पळून गेले होते. (हेही वाचा -
यातील एक बिहारचा बेहकू राम आणि दुसरा नेपाळचा रहिवासी तिलबहादूर थापा असल्याची माहिती पोलिसांनी ट्विट करून दिली होती. याशिवाय 18 ऑक्टोबर रोजी दक्षिण काश्मीरमधील शोपियानमध्ये उत्तर प्रदेशातील दोन कामगारांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कन्नौज जिल्ह्यातील मुनीश अहमद आणि सागर अली अशी या दोघांची नावे होती. पोलिसांनी सांगितले होते की, दहशतवाद्यांनी आधी घरात झोपलेल्या कामगारांवर ग्रेनेड फेकले होते. यानंतर गोळ्या झाडून त्यांचा मृत्यू झाला.