Photo Credit- X

Ghaziabad Reel Tragedy: रील (Reel)बनवण्याच्या क्रेझने देशभरातील तरुणांना वेड लावले आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आणि पोस्टला लाइक्स मिळविण्यासाठी तरूणाई कोणत्याही थराला जायला तयार आहेत. अशीच एक घटनेत गाझियाबादमधून (Ghaziabad)समोर आली आहे. इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून एक मुलगी इन्स्टाग्राम रील बनवताना पडली. ती घराच्या बाल्कनीत उभी होती तेव्हा तिच्या हातातून मोबाईल निसटला. फोन पकडण्याच्या प्रयत्नात ती बाल्कनीतून पडली (Girl Falls From Balcony)आणि तिला गंभीर दुखापत झाली. वेदनांनी विव्हळताना मुलगी आणि तिची आई तिला मदतीसाठी बोलावताना दिसली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (हेही वाचा: Stunt Viral Video: चालत्या ट्रकच्या मागे जीव डोक्यात घालून स्केटिंग करत होते दोन तरुण, व्हिडीओ व्हायरल)

 

तरुणी बाल्कनीतून पडली

मोनिषा असे या तरुणीचे नाव असून, ती गाझियाबादमधील इंदिरापुरम परिसरात असलेल्या क्लाउड-९ सोसायटीमध्ये राहात होती. सहाव्या मजल्यावरून पडल्याने तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मुलगी जमिनीवर पडलेली दिसत आहे. लोक तिला मदतीसाठी आणि रुग्णालयात घेऊन जाताना धवपळ करताना दिसत आहेत. ती वेदनेने ओरडत असल्याचे दिसले. वारंवार ती तिच्या आईला वडिलांना हाक मारण्यास सांगून, 'माँ, पापा को बुलावो' असं म्हणताना दिसत आहे.