Diwali 2018 धनतेरस विशेष : नरेंद्र मोदी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेतील सोन्या, चांदीच्या वीटा विक्रीला !
नरेंद्र मोदी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेतील सोन्या, चांदीच्या वीटा Photo Credit : Twitter

आज दिवाळीच्या सणांमध्ये धनत्रयोदशी (धनतेरस) या सणाचा उत्साह आहे. भारतभर धनत्रयोदशीच्या दिवशी विविफ्ह प्रकारे पूजा केली जाते. या 'माया' म्हणजे पैसा आणि 'काया' म्हणजे आरोग्यासाठी प्रार्थना करण्याची प्रथा आहे. पण याबरोबरीने धनतेरसच्या दिवशी सोनं, चांदी किंवा एखादं भांडं विकत घेण्याची प्रथा आहे. सुरतमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चक्क एका विक्रेत्याने सोन्या,चांदीच्या विटांवर नरेंद्र मोदी आणि अटलबिहारी वाजपेयींचे फोटो छापले आहेत.

सुरतमध्ये काही ग्राहकांच्या आयुष्यात लक्ष्मी आणि गणपतीप्रमाणेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्थानही देवासारखे आहे. त्यामुळे ग्राहकाच्या मागणीनुसार सोन्याच्या वीटेवर नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींची प्रतिमा छापण्यात आली आहे. यंदा धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं, चांदीची वस्तू विकत घेण्याची शुभ वेळ कोणती?

 

5 ग्रॅमपासून  1  किलोपर्यतच्या विविध वजनांमधील सोन्या, चांदीच्या बिस्किटांवर नरेंद्र मोदी आणि अटलबिहारी वाजपेयींचा फोटो असलेल्या वीटा विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सुरतच्या या सराफाच्या दुकानात दरवर्षी विविध आणि नव्या स्वरूपातील गोष्टी विक्रीला ठेवण्यात येतात.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी लग्नसराईचा काळ पाहता सोन्याचा दर बाजारात चढा राहणार असून 35 हजारांपर्यंत पोहचण्याची शक्यता असल्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे. धनतेरस साजरी करण्यामागे कारण काय ? धनरतेरस पूजा, विधी आणि शुभ मुहूर्त