SBI Kavach Personal Loan: स्टेट बँक ऑफ इंडिया करणार कोरोना उपचारासाठी आर्थिक मदत, जाणून घ्या कसा घेता येईल या सेवेचा लाभ
SBI (Photo Credits: Facebook)

भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) नेहमी सर्वोत्तम योजना (scheme)  ग्राहकांसाठी देत असते. नुकतीच स्टेट बँक ऑफ इंडियाने एक उत्तम योजना सुरू केली आहे. या योजनेला कवच पर्सनल लोन (Kavach Personal Loan) नाव दिले आहे. वास्तविक या विशेष कर्जामध्ये, बँक आपल्या ग्राहकासाठी आणि ग्राहकाच्या कुटुंबातील सदस्यांसाठी कोरोनाच्या (Corona Treatment) उपचाराचा खर्च भागवते.  एसबीआयच्या मते, कवच पर्सनल लोनचा हेतू ग्राहकांना कोरोनामुळे होणाऱ्या खर्चापासून दिलासा देणे आहे. या कर्जाअंतर्गत ग्राहक आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च बँक (Bank) उचलणार आहे.  एसबीआयच्या या विशेष योजनेमध्ये ग्राहकांना कर्ज घेताना कोणत्याही प्रकारची मालमत्ता जमा करण्याची गरज नाही. या अंतर्गत पाच वर्षांसाठी पाच लाखांचे कर्ज दिले जाईल. त्याच वेळी, किमान 25 हजार पर्यंत कर्ज घेतले जाऊ शकते, ज्याचा व्याज दर 8.5%असेल.

बँकेने म्हटले आहे की हे कर्ज ग्राहकांसाठी खूप चांगले आणि सोयीचे आहे. कारण तीन महिन्यांच्या कर्जाच्या कालावधीनंतरही तीन महिन्यांसाठी कर्ज स्थगितीची तरतूद आहे आणि व्याज दर देखील खूप कमी आहे. एसबीआयने ही कर्ज सुविधा 1 एप्रिल 2021 पासून सुरू केली आहे. या कर्जाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्या लोकांनाही या योजनेचा लाभ मिळेल, त्यांना कोणत्याही प्रकारचे वेतन मिळत नाही.

पेन्शनधारकही या कर्जाचा लाभ घेऊ शकतात. बँकेने कोविड -19 मध्ये कर्जापूर्वी घेतलेल्या वैद्यकीय खर्चाचा समावेश योजनेद्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे. बँक त्या खर्चाची परतफेड देखील देईल. कवच पर्सनल लोन घेण्यासाठी SBI च्या ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करता येतो. या संदर्भात, एसबीआय प्रमुख दिनेश खारा आणि इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष राज किरण राय यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. ज्यात हा निर्णय घेतला गेला.  हेही वाचा Honda Launch CB200X: होंडाची CB200X बाईक भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध, पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

कोरोनाच्या उपचारासाठी देशातील अनेक सरकारी बँकांनी कमी व्याजदर कमी करुन कर्ज जाहीर केले आहेत. मात्र एसबीआय वगळता बँकांनी अद्याप त्यांचे व्याजदर जाहीर केलेले नाहीत. भारतीय रिझर्व्ह बँक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना असे कर्ज वितरीत करण्यासाठी सतत प्रोत्साहन देत आहे. तसेच या व्यतिरिक्त, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून हेल्थकेअर व्यवसायाची कर्जे देखील घोषित केली गेली आहेत. जे रुग्णालयांना 2 कोटीपर्यंत स्वस्त कर्ज देतील.