असदुद्दीन ओवेसी यांच्याविरोधात सोशल मीडियावर #ओवैसी_भारत_छोड़ो ट्रेंड सुरू; काय आहे यामागचं कारण जाणून घ्या
Asaduddin Owaisi (Photo Credits-Facebook)

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या वादावर दिलेल्या निर्णयामुळे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी असमाधान व्यक्त केले होते. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर असदुद्दीन ओवेसी विरोधात #ओवैसी_भारत_छोड़ो हा ट्रेंड सुरू आहे. अनेकांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ओवेसी यांना ट्रोल केले आहे. तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य नसेल तर भारत सोडून जा, अशा शब्दांत नेटीझन्सनी ओवेसी यांना सुनावले आहे. (हेही वाचा - अयोध्या प्रकरणी कोर्टाच्या निर्णयावर वक्त्यव्य करणे पडले महागात; असदुद्दीन ओवैसी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल)

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मशिदीसाठी दिलेली 5 एकर जमिनीची ऑफर नाकारली पाहिजे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं होतं. त्यानंतर ओवेसींनी पुन्हा ट्विट करत 'मला माझी मशीद पुन्हा हवी आहे', असे ट्विट केलं होतं. परंतु, या ट्विटनंतर नेटीझन्सनी ओवेसींना सोशल मिडियावर चांगलच ट्रोल करायला सुरूवात केली आहे. आज सकाळपासून ट्विटरवर #ओवैसी_भारत_छोड़ो हा हॅशटॅग 18 हजारपेक्षा जास्त वेळा वापरण्यात आला आहे.

सुप्रीम कोर्टाने 9 नोव्हेंबर रोजी राम जन्मभूमी-बाबरी मस्जिद वादग्रस्त जमिनीप्रकरणी अंतिम निर्णय जाहीर केला होता. वर्षानुवर्ष सुरु असलेल्या या प्रकरणावर अंतिम सुनावणी 40 दिवसांत पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम पक्षकारांच्या वतीने कोर्टात युक्तीवाद करण्यात आले. तर सरन्यायाधिश रंजन गोगई यांच्या नेतृत्वाखीलाल पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने या प्रकरणी ऐतिहासिक सुनावणी करत अंतिम निर्णय जाहीर केला होता. या निर्णयानुसार, वादग्रस्त भाग रामलल्लांचा तर मशिदीसाठी अयोद्धेत 5 एकर जागा दिली जाणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.