अयोध्या प्रकरणी कोर्टाच्या निर्णयावर वक्त्यव्य करणे पडले महागात; असदुद्दीन ओवैसी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

ओवैसीविरूद्ध देशद्रोह आणि विशिष्ट धर्माच्या लोकांना भडकवण्याबाबत एफआयआर नोंदविण्याची मागणी करण्यात आली. अयोध्या प्रकरणावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ओवेसी म्हणाले की, 5 एकर जागेची ऑफर परत करावी. मुस्लिम गरीब आहेत, परंतु आम्ही मशिद तयार करण्यासाठी पैसे गोळा करू शकतो

बातम्या Prashant Joshi|
अयोध्या प्रकरणी कोर्टाच्या निर्णयावर वक्त्यव्य करणे पडले महागात; असदुद्दीन ओवैसी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल
AIMIM Chief Asaduddin Owaisi (Photo Credits; IANS/ File)

भोपाळमध्ये अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. अधिवक्ता पवन कुमार यांनी खासदार ओवैसी यांच्याविरोधात जहांगीराबाद पोलिस ठाण्यात, अयोध्या निर्णयावरील विधानाबाबत तक्रार दिली. ओवैसीविरूद्ध देशद्रोह आणि विशिष्ट धर्माच्या लोकांना भडकवण्याबाबत एफआयआर नोंदविण्याची मागणी करण्यात आली. अयोध्या प्रकरणावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ओवेसी म्हणाले की, 5 एकर जागेची ऑफर परत करावी. मुस्लिम गरीब आहेत, परंतु आम्ही मशिद तयार करण्यासाठी पैसे गोळा करू शकतो. या विधानंतर ओवैसी टीकेचे धनी बनले आहेत.

सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय देत, 9 नोव्हेंबर रोजी अयोध्येत राम मंदिर उभारले जावे असे सांगितले होते. तसेच केंद्राला आदेश दिला होता की राम मंदिराच्या उभारणीसाठी तीन महिन्यांत ट्रस्टची स्थापना करण्यात यावी आणि मशीद बांधrdict-77832.html',900, 600)">

बातम्या Prashant Joshi|
अयोध्या प्रकरणी कोर्टाच्या निर्णयावर वक्त्यव्य करणे पडले महागात; असदुद्दीन ओवैसी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल
AIMIM Chief Asaduddin Owaisi (Photo Credits; IANS/ File)

भोपाळमध्ये अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. अधिवक्ता पवन कुमार यांनी खासदार ओवैसी यांच्याविरोधात जहांगीराबाद पोलिस ठाण्यात, अयोध्या निर्णयावरील विधानाबाबत तक्रार दिली. ओवैसीविरूद्ध देशद्रोह आणि विशिष्ट धर्माच्या लोकांना भडकवण्याबाबत एफआयआर नोंदविण्याची मागणी करण्यात आली. अयोध्या प्रकरणावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ओवेसी म्हणाले की, 5 एकर जागेची ऑफर परत करावी. मुस्लिम गरीब आहेत, परंतु आम्ही मशिद तयार करण्यासाठी पैसे गोळा करू शकतो. या विधानंतर ओवैसी टीकेचे धनी बनले आहेत.

सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय देत, 9 नोव्हेंबर रोजी अयोध्येत राम मंदिर उभारले जावे असे सांगितले होते. तसेच केंद्राला आदेश दिला होता की राम मंदिराच्या उभारणीसाठी तीन महिन्यांत ट्रस्टची स्थापना करण्यात यावी आणि मशीद बांधण्यासाठी पाच एकर जागा देण्यात यावी. याच बाबत ओवैसी यांनी 5 एकर जमीन करावी असे सांगितले होते. त्यावर कॉंग्रेस नेते सलमान निजामी यांनी विचारले की, 5 एकर जमीन का नाकारली पाहिजे? ओवेसी मुसलमानांचे ठेकेदार नाहीत. आपण एक मशीद बनविली पाहिजे, जिथे हिंदू आणि मुस्लिम दोघेही एकत्र नांदू शकतील.’ (हेही वाचा: जयपूरच्या राजघराण्यातील युवकाचा रामाचे वंशज असल्याचा दावा; 21 व्या वर्षी आहे कोट्याधीश, जाऊन घ्या एकूण संपत्ती)

सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यावर ओवैसी म्हणाले होती की, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने याचा विचार करावा, सर्वोच्च न्यायालयाचीही चूक होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण करत ओवैसी पुढे म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च आहे, परंतु ते चुकू शकत नाही असे नाही. आम्ही आमच्या कायदेशीर हक्कांसाठी लढत होतो. आम्हाला या पाच एकर जागेची भिक नको आहे. जर बाबरी मशीद तोडली गेली नाही तर, सर्वोच्च न्यायालयाने कोणता निर्णय दिला असता?.’ ओवेसी यांच्या याच वक्तव्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change