सुप्रीम कोर्टाने वर्षानुवर्षे सुरू असलेल्या रामजन्मभूमी वादावर आपला निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हिंदूंच्या बाजूने दिलेला निर्णय ऐतिहासिक ठरला आहे. सध्या भगवान राम आणि राम मंदिराची देशभर चर्चा होत आहे. अशा परिस्थितीत एका तरुणाबद्दल आम्ही आपणास सांगणार आहोत, जो स्वत: ला भगवान रामचा वंशज म्हणवतो. या तरुणाचे वय फक्त 21 वर्षे असून, तो देशातील सर्वात तरुण बिलेनियर आहे. या 21 वर्षांच्या व्यक्तीकडे तब्बल 20,000 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
पद्मनाभ सिंह (Padmanabh Singh) असे या युवकाचे नाव असून तो जयपूरच्या राजघराण्यातील आहे. हा तरुण जयपूरच्या राजघराण्याचा 309 वा वंशज आहे. महत्वाचे म्हणजे पद्मनाभ सिंह एक मॉडेल, पोलो प्लेयर आणि ट्रॅव्हलर देखील आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, जयपूरचे माजी महाराज भवानी सिंग हे रामपुत्र कुशचे 309 वे वंशज होते. या राजघराण्यातील पद्मिनी देवी यांनी स्वत: एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत यामध्ये माहिती दिली होती. याशिवाय या राजघराण्याने आपल्या अधिकृत साइटवरही या गोष्टीचा खुलासा केला आहे. (हेही वाचा: अयोध्या प्रकरणात राम मंदिराच्या बाजूने निकाल येण्यास फायद्याचे ठरले 'हे' 3 महत्वाचे मुद्दे)
आपल्या आलिशान जीवनशैलीसाठी लोकप्रिय असलेल्या पद्मनाभ सिंगचे जयपूरमधील राम निवास पॅलेसमध्ये खासगी आलिशान अपार्टमेंट देखील आहे. अपार्टमेंटमध्ये शयनकक्ष, स्नानगृह, ड्रेसिंग रूम, खाजगी जेवणाची खोली, खाजगी स्वयंपाकघर, व्हरांडा आणि पूल देखील आहे. 2011 मध्ये या राजघराण्याची एकूण संपत्ती 621.8 दशलक्षाहून अधिक होती, म्हणजेच ती 44 अब्ज रुपयांहून अधिक आहे, जी आता वाढून 48 अब्ज रुपयांहून अधिक झाली आहे.
दरम्यान, राजस्थानमधील राजसमंद येथील भाजपा खासदार आणि जयपूरच्या माजी राजकन्या दीया कुमारी यांनीही काही दिवसांपूर्वी दावा केला होता की, त्या रामचा मुलगा कुशची वंशज आहे. दुसरीकडे श्री. राजपूत करणी सेनेचे संयोजक लोकेंद्रसिंह कालवी यांनी 'पद्मावत' चित्रपटाला विरोध दर्शवित दावा केला की, ते भगवान राम यांचा मोठा मुलगा लव यांचे वंशज आहेत.