Medha Patkar (PC - Facebook)

Medha Patkar Gets 5 Month Jail: सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर (Medha Patkar) यांना सोमवारी न्यायालयाकडून मोठा धक्का बसला. दिल्ली न्यायालयाने (Delhi Court) मेधा पाटकर यांना 5 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा (Imprisonment Sentence) सुनावली आहे. याशिवाय 10 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशही देण्यात आले. 23 वर्षे जुन्या गुन्हेगारी मानहानीच्या खटल्यात (Defamation Case) न्यायालयाने हा निकाल दिला. हे प्रकरण दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरशी संबंधित आहे.

या प्रकरणी मेधा पाटकर यांना मे महिन्यात महानगर दंडाधिकारी राघव शर्मा यांच्या न्यायालयाने दोषी ठरवले होते. लेफ्टनंट गव्हर्नर सक्सेना आणि नर्मदा बचाव आंदोलन (NBA) विरुद्ध जाहिराती प्रकाशित केल्याबद्दल सक्सेना यांनी मेघा पाटकर यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला होता. 2000 पासून मेघा पाटकर सक्सेना यांच्याविरोधातील कायदेशीर लढाईत अडकल्या होत्या. (हेही वाचा - Medha Patkar: मेधा पाटकर ईडीच्या रडारवर, DIR आणि आयकर विभागाकडूनही गुन्हा दाखल)

काय आहे नेमकं प्रकरण?

सक्सेना तेव्हा अहमदाबादस्थित एनजीओ नॅशनल कौन्सिल फॉर सिव्हिल लिबर्टीजचे प्रमुख होते. एका टीव्ही चॅनलवर आपल्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल आणि बदनामीकारक विधान केल्याबद्दल सक्सेना यांनी मेघा पाटकर यांच्याविरुद्ध दोन खटलेही दाखल केले होते. (हेही वाचा - Medha Patkar Statement: आता मतदारांनाच नाही तर संपूर्ण देशाला मूर्ख बनवण्याचे षडयंत्र सुरू, मेधा पाटकरांचे वक्तव्य)

या खटल्यात पाटकर यांना दोषी ठरवताना, मॅजिस्ट्रेट कोर्टाने सक्सेनाविरुद्धची त्यांची विधाने केवळ बदनामीकारकच नाहीत तर नकारात्मक धारणा निर्माण करण्यासाठी रचण्यात आल्याचे नमूद केले होते. सोमवारी आदेश सुनावताना न्यायालयाने सांगितले की, मेघा पाटकर यांना त्यांचे वय, आरोग्य आणि शिक्षेचा कालावधी लक्षात घेऊन सश्रम कारावासाची शिक्षा देण्यात आलेली नाही. पाटकर यांनी कोर्टात जामीनासाठी अर्ज केला आहे. जामीन याचिकेवर सुनावणी होईपर्यंत 30 दिवस तुरुंगवासाची शिक्षा स्थगित राहणार आहे.