Fire (Representational image) Photo Credits: Flickr)

कणीस भाजत असताना झोपडीला आग लागल्याने 6 चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही धक्कादायक घटना बिहारच्या (Bihar) अररियातील (Araria) कबाय्या गावात घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत मरण पावलेले मुले 3 ते 6 वयोगटातील आहेत. हे सर्व मुले एकाच परिसरातील रहिवाशी असल्याचे समजत आहे.

गुलनाज (वय, 3), अशरफ (वय, 5), दिलवर (वय, 6), बरकस (वय, 4), अली हसन (वय, 5), खुसनिहार (वय, 5) असे या दुर्घटनेत मरण पावलेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. हे सर्वजण मंगळवारी एका झोपडीत कणीस भाजत होते. मात्र, त्यावेळी झोपडीला आग लागली. मुले झोपडीतून बाहेर पडण्याच्या आतच आगीने रौद्र रूप धारण केले. ज्यामुले या मुलांना बाहेर पडता आले नाही. ज्यामुळे होरपळून सर्वांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत मरण पावलेल्या मुलांच्या कुटुंबियांवर दुख:चे डोंगर कोसळले आहे. हे देखील वाचा- Bihar: नवऱ्यासोबत भांडण झाल्यानंतर महिलेने उचलले धक्कादायक पाऊल, मुलीची हत्या केल्यानंतर बायकोचा आत्महत्येचा प्रयत्न

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलांनी आपल्या कुटुंबियांना न सांगता कणीस घेऊन आले होते. याच गावात भुसांनी बनवलेल्या एका झोपडीत कणीस भाजत होते. दरम्यान, अचानक झोपडीला आग लागली. ज्यामुळे मुलांना झोपडीतून बाहेर पडता आले नाही. माध्यमांच्या वृत्तानुसार, मुलांची ओरड ऐकून गावकरी घटनास्थळी पोहोचले, तोपर्यंत खूप उशीर झाला होता.