Bengluru Loksabha election 2024 PC TWITTER

Loksabha Election 2024: नागरिकांनी मतदान करावं किंवा मतदानाला चालाना मिळावी या करिता अनेक जण वेगवेगळ्या पध्दतीने आवाहन करत असते. 18 व्या लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यांला सुरवात झाली आहे. ठिकठिकाणी मतदानासाठी नागरिकांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. बेंगळूर येथे एका मतदान केंद्रानंतर एका रेस्टॉरेंटला नागरिकांची लाबंच लांब रांगा लावली आहे. मतदानाला चालना मिळावी या करिता रेस्टॉरेंट मालकाने एक शक्कल लढवली आहे. मतदान करणाऱ्यांना रेस्टॉरेंटमधून मोफत डोसा, तुपाचा लाडू आणि ज्यूस देण्यात येत आहे. (हेही वाचा-  लोकसभा निवडणूकीमध्ये आज Nirmala Sitharaman, Sudha Murty, KC Venugopal यांनी बजावला मतदानाचा हक्क)

मिळालेल्या माहितीनुसार, नागरिकांनी मतदानाच्या दिवशी मतदान करा आणि त्यानंतर शाई बोट रेस्टॉरेंटमध्ये दाखवा आणि मोफत डोसा, ज्यूस आणि लाडू मिळवा अशी ऑफर ठेवण्यात आली आहे. यामुळे मतदान केल्यानंतर नागरिकांनी रेस्टॉरेंटच्या बाहेर रांगा लावल्याआहेत. मतदानाला चालना देण्यासाठी असं केल्याचे दिसत आहे. ही ऑफर फक्त मतदान करणाऱ्या नागरिकांसाठी वैद्य असेल. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत ,ज्येष्ठ नागरिकांपासून, तरुण मंडळी आणि महिला देखील या रेस्टॉरेंटमध्ये मोफत खाद्य पदार्थांचा आस्वाद घेत आहे. बेंगळुरूमधील नृपतुंगा रोडवरील निसर्ग ग्रँड हॉटेल येथे सुरु आहे. व्हिडिओ पासून अनेक नेटकऱ्यांनी रेस्टॉरेंट मालकाचे कौतुक केले आहे. मालकांने सांगितले की, आज सकाळ पासून नागरिकांनी रेस्टॉरेंटच्या बाहेर रांगा लावल्या आहेत.