SBI (Photo Credits: Facebook)

जर तुम्ही एसबीआयचे  (SBI) खातेधारक असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण येत्या 1 जुलै पासून बँकेच्या काही नियमात बदल होणार आहेत. नव्या नियमानुसार 1 जुलै नंतर बँकेत बॅलेंस नसल्यास जर ATM च्या माध्यमातून ट्रांजेक्शन Failed झाल्यास तुम्हाला त्यासाठी दंड भरावा लागणार आहे. खरंतर एसबीआय बेसिक सेविंग्स बँक डिपॉझिट (BSBD) खातेधारकांसाठी नवे सर्विस चार्ज 1 जुलै 2021 पासून लागू करणार आहे. बँकेने एटीएम मधून पैसे काढणे, चेकबुक, मनी ट्रान्सफर आणि नॉन फायनानशिएल ट्रांजेक्शनवर सर्विस चार्ज वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

बँकेनुसार, बॅलेंस नसल्यास तुम्हाला प्रति फेल ट्रांजेक्शनवर 20 रुपयांचा दंड द्यावा लागणार आहे. त्याचसोबत तुम्हाला जीएसटी सुद्धा त्यावर भरावा लागणार आहे. बँकेने ही माहिती आपल्या वेबसाइटवर दिली आहे. बँक या व्यतिरिक्त अन्य काही नियमांत सुद्धा बदल करणार आहे. तर जाणून घ्या नव्या दंडाबद्दल अधिक माहिती.(7th Pay Commission: केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; जुलैपासून मिळू शकतो अधिक पगार, महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता)

ग्राहक जर महिन्यातून 4 हून अधिक वेळा बँकेतून पैसे काढत असेल तर त्याच्याकडून अतिरिक्त चार्ज वसूल केला जाणार आहे. या ट्रांजेक्शनमध्ये बँकेच्या एटीएमचा सुद्धा समावेश आहे. सोप्प्या भाषेत बोलायचे झाल्यास जर तुम्ही चार हून अधिक वेळा बँकेच्या शाखेतून किंवा एटीएम मधून पैसे काढल्यास तर तुम्हाल 15 रुपये आणि जीएसटी शुल्क भरावा लागणार आहे. हा चार्ज प्रत्येक अतिरिक्त ट्रांजेक्शवर लागू होणार आहे. दरम्यान एसबीआय आणि नॉन-एसबीआय शाखेत BSBD खातेधारकांद्वारे नॉन-आर्थिक ट्रांजेक्शनवर कोणताही चार्ज स्विकारला जाणार नाही आहे.

बीएसबीडी ग्राहक एसबीआय एटीएम आणि नॉन-एसबीआय मधून चार वेळा आणि त्याहून अधिक वेळा पैसे काढत असल्यास त्यांना सर्विस चार्ज द्यावा लागणार आहे. सर्विस चार्जच्या नावावर बँकेकडून 15 रुपये आणि जीएसटी चार्ज वसूल केला जाणार आहे. मात्र जर तुम्हाला या दंडापासून बचाव करायचा असल्यास तुम्ही मिस्ड कॉल किंवा SMS च्या माध्यमातून ग्राहकांना बचत खात्यामधील शिल्लक असलेल्या रक्कमेबद्दल माहिती करुन घेऊ शकता. एटीएम मधून पैसे काढण्यापूर्वी तुम्ही खात्यात किती रक्कम शिल्लक आहे ते जाणून घ्या.

मीडिया रिपोट्समध्ये सांगण्यात आले आहे की, खातेधारकांना आर्थिक वर्षात 10 चेक मोफत मिळणार आहेत. त्यानंतर मात्र 10 चेक असणाऱ्या बुकसाठी 40 रुपये आणि जीएसटी भरावा लागणार आहे. 25 चेक असलेल्या बुकसाठी 75 रुपयांसह जीएसटी द्यावा लागणार आहे. आपत्कालिन चेकबुकसाठी, 10 लीवसाटी 50 रुपये अधिक जीएसटी द्यावा लागणार आहे. वरिष्ठ नागरिकांना मात्र चेकबुकच्या नव्या सर्विस चार्ज मधून सूट दिली गेली आहे.