SBI (Pic Credit- SBI Twitter)

स्टेट बॅंक ऑफ इंडिया (The State Bank of India) कडून स्पेशॅलिस्ट केडर ऑफिसर (Specialist Cadre Officer) पदासाठी नोकरभरती जाहीर करत त्यासाठी ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन मागवण्यास सुरूवात केली आहे. 9 डिसेंबरपासून यासाठी अर्ज दाखल करणं सुरू झाले आहे. दरम्यान यासाठी पात्र उमेदवार sbi.co.in वर आपला अर्ज दाखल करू शकतात. 29 डिसेंबर पर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. यामध्ये 54 जागांसाठी अर्ज स्विकारले जात आहे.

स्पेशॅलिस्ट केडर ऑफिसर साठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया काहींसाठी सशुल्क आहे. यामध्ये जनरल/ईडब्लूएस/ओबीसी कॅटेगरी मधील अर्जदारांना 750 रूपये शुल्क भरावा लागणार आहे. तर एससी, एसटी, पीडब्लूडी प्रवर्गातील अर्जदारांना शुल्क माफ असणार आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची फी न भरता आपला अर्ज दाखल करता येणार आहे. नक्की वाचा: Samsung To Hire Engineers: देशातील अभियंत्यांसाठी खुशखबर; सॅमसंग करणार IIT आणि टॉप इंजिनीअरिंग संस्थांमधून सुमारे 1,000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती .

कसा सादर कराल अर्ज?

  • SBI’s career page -sbi.co.in/web/careers ला भेट द्या.
  • होमपेजवर तुम्हांला “RECRUITMENT OF SPECIALIST CADRE OFFICERS” या लिंकवर क्लिक करावं लागेल.
  • त्यानंतर “Apply Online” वर क्लिक करा.
  • आता तुमचा फॉर्म भरा. फी भरा.
  • फॉर्म भरून आता त्याची प्रिंट आऊट काढून ठेवा.

नोटिफिकेशनुसार, निवड शॉर्टलिस्टिंग-कम-इंटरॅक्शन आणि CTC Negotiation वर आधारित आहे. बँकेने स्थापन केलेली शॉर्टलिस्टिंग समिती शॉर्टलिस्टिंग पॅरामीटर्स ठरवेल आणि त्यानंतर बँकेने ठरविल्यानुसार पुरेशा उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल. उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्याचा बँकेचा निर्णय अंतिम असेल. या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.

निवडीसाठी गुणवत्ता यादी केवळ मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे बनवली जाणार आहे. जर एकापेक्षा जास्त उमेदवारांनी कट-ऑफ गुण मिळवले, तर अशा उमेदवारांना त्यांच्या वयानुसार, उतरत्या क्रमाने, गुणवत्तेनुसार रँक केले जाईल.