रामनवमीच्या मुहूर्तावर जेएनयूमध्ये (JNU) मांसाहार देण्याच्या प्रकरणाने आता राजकीय रंग घेतलेला दिसत आहे. आता या वादात केंद्रीय मंत्र्यांनीही उडी घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणावर नाराजी व्यक्त करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Aathwale) यांनी दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आवाहन केले असून, जे घडले, ते व्हायला नको होते, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, रामनवमी हा हिंदूंचा पवित्र सण आहे, यानिमित्ताने कोणी मांसाहार न करण्याची भूमिका घेत असेल, तर त्यात गैर काय आहे. आठवले यांच्या मते सर्व विचारधारा स्वीकारल्या पाहिजेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ कॅम्पसमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात दिल्ली पोलिसांनी सोमवारी अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला.
ज्यामध्ये 6 विद्यार्थी जखमी झाले. DCP मनोज सी म्हणाले, आम्हाला JNUSU, SFI, DSF आणि AISA च्या विद्यार्थ्यांच्या गटाकडून अज्ञात ABVP विद्यार्थ्यांविरुद्ध तक्रार मिळाली आहे. डीसीपी पुढे म्हणाले की, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) विद्यार्थ्यांनीही लेखी तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे. याबाबत आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. हेही वाचा Silver Oak Attack: पोलीस अधिकारी विश्वास नागरे पाटील यांना निलंबीत करुन चौकशी करावी- ॲड. प्रकाश आंबेडकर
देशातील सर्वात प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक असलेल्या जेएनयूमध्ये रविवारी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. डाव्या आघाडीच्या सदस्यांनी ABVP वर कॅम्पसमधील वसतिगृहात मांसाहारावर बळजबरीने बंदी घातल्याचा आरोप केला, तर ABVP ने आरोप केला की NSUI सह डाव्या आघाडीचे सदस्य त्यांना रामाच्या निमित्ताने पूजा आणि हवन कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी देत होते. नवमीला परवानगी नव्हती.