Rajasthan News: 24 वर्षीय महिला बोअरवेलात अडकली, घटनास्थळी NDRF आणि SDRF टीम दाखल, गुडला येथील घटना
Woman Trapped In Borewell PC ANI

Rajasthan News: राजस्थान येथील गंगापूर शहरातील गुडला ग्रामपंचायचीच्या रामनगर धोसी गावात बुधवारी महिला एका बोअरवेलमध्ये पडली. या घटनेची माहिती मिळताच, प्रशासकीय अधिकारी तातडीने कामाला लागले. गंगापूरचे जिल्ह्याधिकारी डॉ. गौरव सैनी यांच्या निर्दैशानुसार बोअरवेलमध्ये पडलेल्या महिलेला वाचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरु असल्याने एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे टीम हजर आहेत. (हेही वाचा- 109 तास बोअरवेल मध्ये अडकलेल्या फतेहवीर सिंह याला बाहेर काढल्यानंतर काही वेळातच मृत्यू)

मिळालेल्या माहितीनुसार, गुडला ग्रामपंचायतीच्या रामनगर धोसी बेरावयो येथे ही घटना घडली. मोनिका बैरावो (वय वर्ष २४) हीचा पाय मुरडल्याने अपघात झाला. ती बोअरबेलमध्ये पडली. बोअरबवेलची खोली सुमारे 95 ते 100 फुट असल्याचे सांगण्यात येत आहे. महिला पडल्याची माहिती मिळताच,  गावात जिल्हा प्रशासन घटनास्थळी पोहचले. जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याची माहिती समोर येत आहे.

मोनिका बुधवारी रात्र आठ वाजल्यापासून घरातून बेपत्ता होती. रात्री उशिरापर्यंत मोनिका घरी न पोहोचल्याने कुटुंबियांनी मोनिकाचा शोध घेतला. मात्र मोनिका कुठेच सापडली नाही. सकाळी अकराच्या सुमारास बोअरवेलजवळ मोनिकाची चप्पल पडलेली दिसली. त्यामुळे ती महिला बोअरवेलमध्ये पडली असावी अशी भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली. या घटनेनंतर गावात एकच खळबळ होती.